म्हणून…!

Started by Vkulkarni, September 20, 2010, 10:04:42 AM

Previous topic - Next topic

Vkulkarni

संध्याकाळी...
जेव्हा जेव्हा...
जुनी वही उघडली जाते,
दुमडलेली पाने...
आपोआपच उलगडत जातात,
पानोपानी..., सापडतात....
सांडलेली आठवांची मोरपीसे...
आणि अलगद निवळतात..
ते निळेशार घनडोह..., तुझ्या डोळ्यांचे!
खरं सांगू...
हे सारं खुप आवडतं, हवंहवंसं वाटतं ...
पुन्हा-पुन्हा उलगडावंसं वाटत राहतं ...
तू आहेस ना सोबत...
म्हणून...!

anolakhi

Really m started to become fan of ur writing...keep goin..