भोवरे…

Started by Vkulkarni, September 20, 2010, 10:05:26 AM

Previous topic - Next topic

Vkulkarni

वहीची दुमडलेली पाने...
पानापानांतून सोडलेली मोरपीसे...
कुठेतरी मधूनच डोकावणारा...
शुष्क पण गंधाळलेला मोगरा...
आठवणींचे खोल डोह...
तळाच्या शेवाळात गुरफटलेली मोहफ़ूले...
पुन्हा पुन्हा भिरभिरणारे...
आठवणींचे बेभान भोवरे...
दुर दुर जाणारी तू...
पुन्हा पुन्हा ओढला जाणारा मी !

विशाल

Jai dait



anolakhi

Awesome is the word....truly...