होळी-रंगपंचमी-कविता-10

Started by Atul Kaviraje, March 06, 2023, 10:48:59 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    होळी-रंगपंचमी
                                   --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०३.२०२३-सोमवार आहे. आज होळी आहे. चला तर साऱ्यांनी दुष्ट प्रवृत्तींना होळीत जाळून, सुष्ट गोष्टींना जीवनात स्थान देऊया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना होळीच्या अनेक हार्दिक शुभेछया. वाचूया, तर होळीच्या काही कविता--

उघडली आज रंगांची पेटी,
झाल्या सर्व वराडाच्या भेटी जमली होती रंगांची वरात,
रंगीबेरंगी गाणे वाजत होते
जोरात रंगापंचमी चे मुहूर्त होते,
रंगांचे रंगाशी जुळले नाते,
वरपक्ष होते पांढरे,
वधूपक्षी होते रंग सारे
जेव्हा दोनी पक्ष सारखे बसले,
डोळ्याला खूप सुंदर दिसलें
अशी अनोखी सोयरीक जूटली,
सप्तरंगी मग नवरी नटली
रंगीत झाला नवरीचा होबास,
पाणेरी पण रंगांची झाली खास
रंगांना महत्व एकमेकांचे कळले,
मग सर्वांशी त्यांचे ऋणानुबंध जुळले....

--RUSHIKESH GADAM
-------------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी कन्टेन्ट.कॉम)
                   --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.03.2023-सोमवार.
=========================================