होळी-रंगपंचमी-कविता-12

Started by Atul Kaviraje, March 06, 2023, 10:51:45 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     होळी-रंगपंचमी
                                    --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०३.२०२३-सोमवार आहे. आज होळी आहे. चला तर साऱ्यांनी दुष्ट प्रवृत्तींना होळीत जाळून, सुष्ट गोष्टींना जीवनात स्थान देऊया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना होळीच्या अनेक हार्दिक शुभेछया. वाचूया, तर होळीच्या काही कविता--

तुझ्या हाती होते रंग, मी दूरुनी पाहिले होते.
तू आलीस रंग खेळाया,
मी.. नकोच म्हटले होते.
शेवटी धरलास तू अबोला,
तू माझा मात्र नाईलाज झाला.
तुझ्या स्पर्शाने मोहरलेला रंग,
क्षणात माझ्या गाली चढला.
तेव्हा तुझा तो रुसलेला चेहरा,
अगदी खुदकन हसला होता.
कारण... हात तुझा मी हाती घेऊन,
तो रंग स्वतःस लाविला होता...!

--© सिध्दलिखित
----------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी कन्टेन्ट.कॉम)
                   -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.03.2023-सोमवार.
=========================================