होळी-रंगपंचमी-कविता-13

Started by Atul Kaviraje, March 06, 2023, 10:53:00 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     होळी-रंगपंचमी
                                    --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०३.२०२३-सोमवार आहे. आज होळी आहे. चला तर साऱ्यांनी दुष्ट प्रवृत्तींना होळीत जाळून, सुष्ट गोष्टींना जीवनात स्थान देऊया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना होळीच्या अनेक हार्दिक शुभेछया. वाचूया, तर होळीच्या काही कविता--

आज रंगीन रंगात रंगीत विश्व रंगबेरंगी रंगछटेने रंगून जाणार....

कृष्ण वर्णात मलीन झालेलं हे विश्व आज रंगांमध्ये न्हाऊन निघणार,
अविश्वास, क्रोध अशा अनेक कारणाने गुरफटलेलं मन आज माणसांमध्ये एका ठिकाणी स्थिरावणार...

अलिखित नियमातल्या एकांताला विराम लागून पूर्वापार एकतेचा मेळ पून्हा लागणार, स्वविचाराने माखलेलं अबोल चित्त आज सर्वांमध्ये रममाण होणार...

स्वरचित पारतंत्र्याच्या युगाचा उंबरठा ओलांडून तेजोमय पाऊल बाहेर पडणार,
महागडा आपला 'माणुसकी धर्म' आज विश्वकृपेने मोफत मिळणार...

ममता, आदर इतका बहरणार, भूमीमायसुद्धा अपुरी पडणार
अमाप एकता आसमंती अभिमानाने भिडणार,
मग नभाला होणाऱ्या अलगद स्पर्शाने प्रफुल्लतेचाही वर्षाव होणार...

--शब्दसम्राज्ञी
------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी कन्टेन्ट.कॉम)
                  --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.03.2023-सोमवार.
=========================================