होळी-रंगपंचमी-कविता-19

Started by Atul Kaviraje, March 06, 2023, 11:00:16 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      होळी-रंगपंचमी
                                     --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०३.२०२३-सोमवार आहे. आज होळी आहे. चला तर साऱ्यांनी दुष्ट प्रवृत्तींना होळीत जाळून, सुष्ट गोष्टींना जीवनात स्थान देऊया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना होळीच्या अनेक हार्दिक शुभेछया. वाचूया, तर होळीच्या काही कविता--

रंग तुझा... रंग माझा...

तुझा हा अट्टाहास मी पूर्ण करू कसा....? !
मला पडलेल्या प्रश्नाच उत्तर मी शोधु तरी कसा....?
का लाऊ मी हा गुलाल तुझ्या गाली.....?
लाडिक गुलाबी खळीला मी छेडू तरी कसा....?
आणि जर छेडलाच तो रंग तर दूर जाऊन लाजू नको..
बाव-या मनाला असे वेडे पिसे करू नको...!!

तू उधळशील रंग तोडून सारे बंध... हर्षून...हरपून....
बेभान... चिंब चिंब ... मी स्तब्द... निशब्द... धुंद... बेधुंद...
या व्याकूळ आसुसलेल्या मनाला आवरू तरी कसा....?
सांग तुझा अट्टाहास मी पूर्ण करू कसा....?
मला पडलेल्या प्रश्नाच उत्तर मी शोधु तरी कसा....? !

--रुपाली..... (सायरा)
--------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी कन्टेन्ट.कॉम)
                   --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.03.2023-सोमवार.
=========================================