होळी-रंगपंचमी-कविता-20

Started by Atul Kaviraje, March 06, 2023, 11:22:01 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     होळी-रंगपंचमी
                                    --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०३.२०२३-सोमवार आहे. आज होळी आहे. चला तर साऱ्यांनी दुष्ट प्रवृत्तींना होळीत जाळून, सुष्ट गोष्टींना जीवनात स्थान देऊया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना होळीच्या अनेक हार्दिक शुभेछया. वाचूया, तर होळीच्या काही कविता--

कित्येक वर्षे झाली होळी खेळलोच नाही
तुझ लग्न झाल्यापासून...
तुझ्या शिवाय दुसरीला रंग लावावा
अस वाटलच नाही कधी मनापासून ...

रंग खेळण तर
बहाणा असायचा
वाटायचं एक दिवस तरी
दूर कस राहायचं तुझ्यापासून ...

रंगाचा मोह मला कधीच नव्हता
कारण माझ्या जीवनात
रंग भरायला सुरुवातच
झाली होती तुझ्यापासून ...

मला रंगीन करून
माझ्या जीवनाला
बेरंग करून तू
गेलीस दूर माझ्यापासून ...

तरीही प्रत्येक होळीला
तू लाडाने मला विचारतेस
राजा का पळतोस
दूर रंगापासून ...

भिऊ नकोस
मीच आता भरणार
रंग माझ्या जीवनात
ह्या होळीपासून ...

--निलेश बामणे
--------------

                      (साभार एवं सौजन्य-संदर्भ-अजब गजब.कॉम)
                     ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.03.2023-सोमवार.
=========================================