प्रेमालापावर कविता-माझं असं माझ्यापाशी काहीच नाही, तुझंच आहे प्रिये, सर्वकाही !

Started by Atul Kaviraje, March 06, 2023, 04:42:16 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, प्रेयसीच्या प्रेमालापावर कविता-गीत ऐकवितो. "चुरा लिया है तुम ने जो दिल को, नज़र नहीं चुराना सनम"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली मार्च महिन्याची ही सोमवार-दुपार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( चुरा लिया है तुम ने जो दिल को, नज़र नहीं चुराना सनम)           
------------------------------------------------------------------

              "माझं असं माझ्यापाशी काहीच नाही, तुझंच आहे प्रिये, सर्वकाही !"
             ----------------------------------------------------------

माझं असं माझ्यापाशी काहीच नाही,
तुझंच आहे प्रिये, सर्वकाही ! 👍
माझं दिल तुला केव्हाच दिलंय मी,
आता ते माझं नाही राहिलंय प्रिये.

माझं असं माझ्यापाशी काहीच नाही,
तुझंच आहे प्रिये, सर्वकाही ! 👍
माझं सर्वस्व आता तुझी अमानत आहे,
त्याला तू जन्मभर जतन कर, प्रिये.

आशिकीने तुझ्या रंग आणलाय जीवनात
बदलच झालाय तू आल्यापासून आयुष्यात
तू अशीच राहा माझ्यासाठी, माझी होऊन,
केव्हाच बदलू नकोस, कुणास फशी पडून.

आज माझ्या दिलावर तुझंच राज्य आहे 💕
या राज्याची तू अनभिषिक्त राणी आहेस
मला नाही व्हायचंय या साम्राज्याचा राजा,
बस दासच होऊन राहायचंय मला तुझा. 🙇

माझ्या आयुष्यात बहार होऊन आलीस तू
नकळतच माझी प्रेयसी झालीस तू
आता येणारे सारे दिवस माझे आहेत,
माझे सारे क्षण आता तुझे आहेत.

तू माझीच आहेस प्रिये, माझीच हो
इच्छा माझ्या मनातली अशीच राहो
बस इतकाच वादI कर माझ्याशी तू,
मला सोडण्याचे नावही नको घेऊस तू.

प्रिये, तुझ्यासाठी मी काहीही करीन
स्वतः लुटेन पण तुला मी सजवीन
हृदयात फक्त स्थान आहे तुलाच,  💘
स्वरक्ताने तुझं नाव मी त्यावर गिरवीन.   

तुझ्याशी आजवर मी प्रामाणिकच राहिलोय
तुझाशी विश्वासघात कसा मी करीन ?
माझी वफा, माझा विश्वास,
एक दिवस जगाला दाखवून देईन.

माझं असं माझ्यापाशी काहीच नाही,
तुझंच आहे प्रिये, सर्वकाही ! 👍
माझं दिल तुला केव्हाच दिलंय मी,
आता ते माझं नाही राहिलंय प्रिये.

माझं असं माझ्यापाशी काहीच नाही,
तुझंच आहे प्रिये, सर्वकाही ! 👍
माझं सर्वस्व आता तुझी अमानत आहे,
त्याला तू जन्मभर जतन कर, प्रिये.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.03.2023-सोमवार.
=========================================