हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून-अजून एक वर्ष निघून गेलंय

Started by Atul Kaviraje, March 06, 2023, 07:25:28 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून"
                            --------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून" या शीर्षकI-अंतर्गत हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध बँड पथक-"a1", यांचे एक भाषांतरित,अनुवादित गाणे. या गाण्याचे शीर्षक आहे- "Another Year Gone"-"अजून एक वर्ष निघून गेलंय"

                              "अजून एक वर्ष निघून गेलंय"
                             --------------------------

"Another Year Gone"
"अजून एक वर्ष निघून गेलंय"
-------------------------

मी बर्फ वितळून जाताना पाहिलाय
मी थंड वारा बदलताना अनुभवलाय
पण त्याच त्या जुन्या बर्फाच्या गोळ्यासारखा
माझ्या जीवनात आजही हिवाळाच राहिलाय.

जशी झुडपे तशीच पडून असतात जमिनीवर
मी जगतोय अगदी तसंच, त्याच धर्तीवर
पुन्हा अगदी पहिल्यासारखच घडून आलंय
माझ्या जीवनात आजही हिवाळाच राहिलाय.

कोरस-
आणि एक वर्ष निघून गेलंय
पण आयुष्य माझं तसंच राहिलंय
प्रत्येक वर्षाकाठी केलेला संकल्प
माझा तसाच राहून गेलाय
मी पुन्हा एकदा उभा आहे वर्षाच्या उंबरठयावर
पुन्हा एकदा लक्ष देऊन आहे सरत्या वर्षावर.

तुझ्या खिडकीच्या चौकटीखालून पाहतोय
जणू काही काळही तिथेच थांबतोय
मी या जादुई दुनियेत अडकलोय
सर्व खोटंच आहे, फक्त प्रकाशाचा आभास होतोय.

कोरस-
आणि एक वर्ष निघून गेलंय
पण आयुष्य माझं तसंच राहिलंय
प्रत्येक वर्षाकाठी केलेला संकल्प
माझा तसाच राहून गेलाय
मी पुन्हा एकदा उभा आहे वर्षाच्या उंबरठयावर
पुन्हा एकदा लक्ष देऊन आहे सरत्या वर्षावर.

तुला धक्काच बसेल हे सारं ऐकून
एक दिवस ही काच तुटेल तडा बसून
मग जणू पाण्याचा पुरंच येईल
आणि त्या महापुरात माझं अस्तीत्वच बुडून जाईल.

कोरस-
आणि एक वर्ष निघून गेलंय
पण आयुष्य माझं तसंच राहिलंय
प्रत्येक वर्षाकाठी केलेला संकल्प
माझा तसाच राहून गेलाय
मी पुन्हा एकदा उभा आहे वर्षाच्या उंबरठयावर
पुन्हा एकदा लक्ष देऊन आहे सरत्या वर्षावर.

--a1
------
                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-az-लैरिकस.कॉम)
                   ------------------------------------------

-----संकलक आणि अनुवादक 
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.03.2023-सोमवार.
=========================================