होळी-रंगपंचमी-चारोळ्या-1

Started by Atul Kaviraje, March 07, 2023, 10:21:59 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     होळी-रंगपंचमी
                                    --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.०३.२०२३-मंगळवार आहे. आज रंगपंचमी आहे. चला तर साऱ्यांनी प्रेमाच्या रंगात रंगून जाऊन एकमेकांना रंग लावूया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना रंगपंचमीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, तर रंगपंचमीच्या काही चारोळ्या--

     चारोळी (चार + ओळी) (इंग्रजी: Owls) म्हणजे चार ओळीची कविता होय. आणि या चारोळीच्या संग्रहाला (कडव्यांना) चारोळ्या (चार + ओळ्या) म्हटले जाते.

     कुठल्याही विषयवार आपण चार ओळींची कविता लिहू शकतो चारोळी ही कुठल्याही विषयांवर कमी शब्दात भावना व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम आहे, आज आपण होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने या लेखात काही चारोळी पाहू

               होळी चारोळी-रंगपंचमी मराठी चारोळी --

=========================================
नवीन सुवासीत विचारी रंगांनी उत्साहित होऊया..
नव्या जोशाने ध्येय गाठूया..
उदाशीत विचारांची होळी पेटवूया..
नवं लक्ष गाठूया...

_____________________________

होळी रे होळी,
सुखाची गोळी
होळी रे होळी,
करा दुखाची राख रांगोळी ।

___________________________

नकार राधेचा होळी खेळाला,
पण कृष्ण उत्साही आहे..
बोलावूनी राधेला अंगणात,
रंगाची उधळण करत आहे..

___________________________

होळी च्या दिवशी चेहरा माझा तुझ्या रंगानी रंगला
पण तुझ्या स्पर्शाने त्या रंगानी माझा जीव तुझ्यात दंगला.।

___________________________

काय ओठांवर ठेवू तुझ्या?
माझे जळाले ओठही, शब्दही...
वेचलेल्या आठवांची मोळी केली,
पण शेवटी जाळली होळीत तीही......!

___________________________

रंगात मिसळल्या भावना साऱ्या.
त्या त्यातचं विरघळल्या तर बंर होईल...
कडु भावनांनी केलं मनावर..
ओझ किमान ते तरी कमी होईल..
=========================================

--मराठी कन्टेन्ट
--------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी कन्टेन्ट.कॉम)
                   --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.03.2023-मंगळवार.
=========================================