होळी-रंगपंचमी-शुभेच्छा आणि संदेश-1

Started by Atul Kaviraje, March 07, 2023, 10:26:46 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     होळी-रंगपंचमी
                                    --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.०३.२०२३-मंगळवार आहे. आज रंगपंचमी आहे. चला तर साऱ्यांनी प्रेमाच्या रंगात रंगून जाऊन एकमेकांना रंग लावूया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना रंगपंचमीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, तर रंगपंचमीच्या काही शुभेच्छा आणि संदेश--

             रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि संदेश--

     होलिकेचे दहन करुन 'होळी' हा सण साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण म्हणजे 'रंगपंचमी'. यालाच धुळवड असे देखील म्हणतात. या दिवशी रंगाची उधळण केली जाते. देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो. रंगपंचमी सणाची माहिती आणि साजरा करण्यामागे अनेक कारणं सांगितली जातात. त्यापैकीच एक म्हणजे वातावरणातील बदल. साधारण मार्च महिना सुरु झाला की, अंगाची लाहीलाही व्हायला सुरुवात होते. याशिवाय वातावरण बदलाचे स्वागत करण्यासाठी आणि येणाऱ्या नव्या पालवीसोबत आनंद व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो असे म्हणतात. होळी आणि रंगपंचमी या दिवसाला आपआपले महत्व आहे. रंगपंचमीचा हा सण अधिक चांगल्या पद्धतीने साजरा करण्यासाठी आम्ही रंगपंचमीच्या शुभेच्छा संदेश, रंगपंचमी कोट्स (Rang Panchami Quotes In Marathi), रंगपंचमी एसएमएस (rang panchami sms in marathi), रंगपंचमी स्टेटस (rangpanchami status in marathi), रंगपंचमी मेसेज (rang panchami messages in marathi) यांची एक यादी केली आहे. या रंगपंचमी शुभेच्छा (Happy Rangpanchami In Marathi) आप्तेष्टांना पाठवून तुम्हाला हा दिवस साजरा करता येईल.

--रंगात रंगूनी जाऊया, सण रंगपंचमीचा आज साजरा करुया...
Happy Rang Panchami 2023

--रंगपंचमीचे रंग जणू, एकमेकांच्या रंगात रंगतात
असूनही रंग वेगळे, रंगाचे महत्व अधोरेखित करतात
रंग रंगपंचमीचा, आनंदभऱ्या नव्या उत्सवाचा.. आला सण रंगाचा
रंग नात्याचा, रंग आनंदाचा
आला रंगाचा सण
साजरा करुया सण रंगपंचमीचा...
Happy Rang Panchami 2023

--प्रेमाचा रंग उधळू दे,  आयुष्यामध्ये रंग येऊ दे
रंग आणो तुमच्या जीवनात आनंदाची लहर
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
एक रंग मैत्रीचा
एक रंग आनंदाचा
सण आला उत्सवाचा
साजरा करुया चला सण रंगाचा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

--लीनल गावडे
-------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.पॉप xo.कॉम)
                   --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.03.2023-मंगळवार.
=========================================