होळी-रंगपंचमी-शुभेच्छा आणि संदेश-5

Started by Atul Kaviraje, March 07, 2023, 10:34:01 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                      होळी-रंगपंचमी
                                     --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.०३.२०२३-मंगळवार आहे. आज रंगपंचमी आहे. चला तर साऱ्यांनी प्रेमाच्या रंगात रंगून जाऊन एकमेकांना रंग लावूया.  मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना रंगपंचमीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, तर रंगपंचमीच्या काही शुभेच्छा आणि संदेश--

             रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि संदेश--

--रंग न जाणती जात न भाषा
चला उडवू रंग
वाढू दे प्रेमाची नशा
साजरी करु धुळवड.. ही मनी आशा
तनमनाला रंगवून जाते ही रंगपंचमी
मनी आनंद आणते ही रंगपंचमी
रंगूनी जाऊ रंगात आता
अखंड उठू दे मनी तरंग
तोडून सारे बंध सारे
असे उधळुया आज हे रंग
रंगपंचमीच्या शुभेच्छा!

--रंगपंचमीचे रंग जणू एकमेकांच्या रंगात रंगतात
असूनही वेगळे रंग, रंग स्वतरुच्या विसरुनी
एकीचे महत्व सांगतात
रंगपंचमीच्या शुभेच्छा!

--रंगपंचमी येते सगळ्यांना रंगवून जाते
रंग निघून जातात
पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच टिकून राहतो
रंग काय लावायचा
जो आज आहे उद्या निघून जाईल
लावायचा तर जीव लाव
जो आयुष्यभर टिकेल.
रंगाच्या उत्सवात नाचत आहे मन माझे
रंगात मन माझे आज झुलत आहे
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

--हे आनंदी शुभेच्छा संदेश पाठवून तुमचा आजचा दिवस साजरा करा.
तुम्हा सगळ्यांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

--लीनल गावडे
-------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.पॉप xo.कॉम)
                   ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.03.2023-मंगळवार.
=========================================