प्रेमाच्या जुगलबंदीवर कविता-सूर्य मावळलाय झाली संध्याकाळ,आता तरी सोड मला काहीकाळ

Started by Atul Kaviraje, March 07, 2023, 12:38:10 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, प्रेमाच्या जुगलबंदीवर कविता-गीत ऐकवितो. "ढल गया दिन हो गई शाम जाने दो जाना है"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली मार्च महिन्याची ही मंगळवार-दुपार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( ढल गया दिन हो गई शाम जाने दो जाना है)           
------------------------------------------------------

           "सूर्य मावळलाय झाली संध्याकाळ, आता तरी सोड मला काही काळ !"
          -------------------------------------------------------------

सूर्य मावळलाय, झाली संध्याकाळ, 🌅
आता तरी सोड मला काही काळ !
महिताहे खूप प्रेम करतोस माझ्यावर, 
एवढं थांबूनही घेतोस तू माझ्यावर आळ.

सूर्य मावळलाय, झाली संध्याकाळ, 🌅
आता तरी सोड मला काही काळ !
अंधार पसरलाय, काळोख झालाय, 🌃
पण तुझं तेच वागणं, सदा सर्व काळ.

     मी ओळखलेत सारे तुझे बहाणे
     नुकतेच तुझे येणे आणि म्हणतेस परत जाणे
     थोडी थांब, आता कुठेशी उन्हे उतरू लागलीत,
     ऐकलीस तर मान्य करीन मी तुझे म्हणणे.

सूर्य मावळलाय, झाली संध्याकाळ, 🌅
आता तरी सोड मला काही काळ !
तुला ना वेळ, ना काही काळ,
सोडूनच दिलंIस तू सगळा तंत्र तIळ.

     माझ्यावर असा जुलूम करू नकोस
     मला अशी सोडून तू जाऊ नकोस
     बघ आताशी कुठे रंगत येतेय प्रेमाला, 💘
     अशी वेळ तू वाया घालवू नकोस.

नको प्रियकरा, नको मला आता थांबवूस
नको ना असा मला तू पाहूस 😍
बघ हळूहळू रात्र वाढू लागलीय, 🌃🌃
आता आणखी अटी तू नको मला घालूस.

     पुन्हा तुझं तेच तेच सुरु आहे
     पुन्हा तू तेच पालुपद लावते आहेस
     बघ, शीतल पवन आपणास साद देतोय,
     चंद्रही हळूहळू आभाळात वर येतोय. 🌛 🌜

आपण कितीतरी वेळ होतो एकत्र यापूर्वी
आपण कितीतरी रात्री घालवल्या यापूर्वी
तरी तुझे मन कसे भरत नाही,
तरी तुझ्या गप्पा कश्या संपत नाहीत.

     बरोबर ओळखलंस तू माझ्या मनातलं, लाडके
     जणू मनकवडीच आहेस तू, प्रिये
     तू बरोबर असलीस की मला गोष्टी सुचतात,
     तुला थांबवण्यास मला त्या प्रवृत्त करतात.

पहा, पुन्हा तू मला बोलण्यात गुंतवू लागलास
पहा, तुझ्या गोष्टीत तू मला गुंगवू लागलास
जाऊ दे मला, उद्या पुन्हा भेटायचं आहे,
धीर धर जरा, फक्त एका रात्रीचंच अंतर आहे.

     रोज काही नवीन गोष्टी रचतेस
     आणि परत जाण्याचा तू बहाणा करतेस
     नाही तुला मी आज जाऊ देणार नाही,
     ही संध्याकाळ मी वाया जाऊ देणार नाही.

महिताहे, मला तू माझा प्रेम-दिवाणा आहेस 💕
महिताहे, मला तू तेवढाच शहाणा आहेस
पण ही काही थांबविण्याची पद्धत नाही, 🖐
ही काही प्रेम सांगण्याची रीत नाही.

आता पुरे झाला बघ तुझा प्रेमालाप
डोक्याला नको देऊस माझ्या तू आणखी ताप
रातकिड्यांची किरकिर पहा झालीय सुरु,
गार वारा पहा लागलाय कसा पसरू.

सूर्य मावळलाय, झाली संध्याकाळ, 🌅 🌃
आता तरी सोड मला काही काळ !
महिताहे खूप प्रेम करतोस माझ्यावर, 
एवढं थांबूनही घेतोस तू माझ्यावर आळ.

सूर्य मावळलाय, झाली संध्याकाळ, 🌅 🌃
आता तरी सोड मला काही काळ !
अंधार पसरलाय, काळोख झालाय, 🌃🌃
पण तुझं तेच वागणं, सदा सर्व काळ.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.03.2023-मंगळवार.
=========================================