प्रेम-ऋतूची युगुल कविता-गीत-मला चैन नाही, झोप नाही, काय केलीस किमया समजत नाही !

Started by Atul Kaviraje, March 07, 2023, 11:55:41 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, प्रेम-ऋतूची युगुल कविता-गीत ऐकवितो. "हाय रे हाय नींद नहीं आए चैन नहीं आए"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली मार्च महिन्याची ही मंगळवार-रात्र आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(हाय रे हाय नींद नहीं आए चैन नहीं आए)           
----------------------------------------------------

            "मला चैन नाही, झोप नाही, काय केलीस किमया समजत नाही !"
           ---------------------------------------------------------

मला चैन नाही, झोप नाही,
काय केलीस किमया समजत नाही !
तुला माझं हृदय दिल्यापासून, ❤
जीव तुझ्यावाचून तळमळत राही !

मला चैन नाही, झोप नाही,
काय केलीस किमया समजत नाही !
तुझ्या प्रेमाने अशी काय केली जादू,
प्रेमात कशी अडकले कळलंच नाही.

मला चैन नाही, मला झोप नाही
डोळ्याला डोळा नाही, रात्र उदासवाणी जाई 🌃 😒
हृदय आता नेहमी तुझंच नाव घेई, 💖
मनात माझ्या तूच भरून राही.

हा वेडा ऋतू, वेडाच करून गेलाय
तुझ्या माझ्या प्रेमाला बहर देऊन गेलाय
आता सारीकडे मला तूच दिसतोस,
माझंच नाव तू नेहमी घेत असतोस.

कुणी पाहिलं तर आपलं काय होईल ?
आपलं नाव मग तर जगजाहीरच होईल     
माझ्या मनात भीती दाटून आलीय,
छातीत माझ्या धडधड वाढू लागलीय.

     चिंता नको करुस, लाडके घाबरू नकोस
     कुणी पाहिल, याची खंत धरू नकोस
     बघ बहर कसा बहरून आलाय,
     आपली प्रेम कहाणी सर्वाना सांगत आलाय. 💑

     पहा आकाशात ढग जमून आलेत
     पाहता पाहता ते बरसूही लागलेत ☔️
     तरीही माझी तहान काही भागत नाही,
     उलट तनात माझ्या आगच दहकत राही.

     बघ प्रेमाचा मौसम आलाय, प्रिये
     मुक्त भांडारच तो उधळून गेलाय
     प्रेमात पडण्याचाच हा मौसम आहे,
     या वेड्याला हा प्रेमात पाडत आहे.

     तुझ्या हृदयाची हाक मी ऐकतोय 💕
     तुझ्या मनातील गुज मी ओळखतोय
     जरा जवळ ये, तुला सर्व कळेल,
     प्रेमाने तुला मी सारे काही समजावेनं.

     लाडके, तू फक्त म्हण, हो
     प्रिये, तू फक्त राजी हो
     तुला मी प्रेमाची निशाणी देईन,
     आयुष्यभर तुझंIच मी होऊन राहीन.

नाही प्रिया, मला हे नाही जमणार
माझा जीव सारखा घाबरत राहणार
पहा लज्जेने मी अधोमुख होतेय,
श्वासात माझ्या एक अंतर पडतेय.

तुझं म्हणणं मला नाही स्वीकार
तुझ्या विनंतीला माझा आहे नकार
वाटतं, काहीतरी विपरीत घडेल हातून
या वेड्या ऋतूच्या नादी लागून.

लाडक्या, ही हवा मला छेडत आहे
मला स्पर्श करून ती काही सांगत आहे
हृदयात अनामिक हुरहूर सुरु होत आहे,
लाजेने गालावर जणू गुलाबच फुलत आहे. 🌹

     लाडके, ही तर प्रेमाची सुरुवात आहे
     तुझ्या माझ्या प्रेमाची ही रुजुवात आहे
     हा बहर, हा मौसम असं घडवणारंच,
     तुला, मला तो प्रेमात पाडणारच.

     तुझ्या मोकळया केसांत माझा जीव अडकतोय
     तुझ्या आर्त मनाचा साद ऐकू येतोय
     मी माझं भान आता विसरत चाललोय,
     तुझ्या प्रेमात मी हळूहळू अडकत चाललोय. 💑

आता समजलंय मला प्रिया, हे प्रेमच आहे
आपलं प्रेम आता हळूहळू रंग आणत आहे
या वेड्या ऋतूने आपलं मन काबीज केलं आहे,
मला तुझ्याकडे, तुला माझ्याकडे आकृष्ठ केलं आहे.

     बस, मला आता आणि काही नको
     तुझा सौंदर्य माझा होशच उडवतंय
     माझ्या पावलांना आता स्थैर्यच नाही, 👣
     तुझं लावण्य मला मोहित करतंय. 

     या वेड्या ऋतूने आपले मन काबीज केलंय
     या दिवाण्या मौसमने आपल्याला प्रेमात पाडलंय
     आपल्याला याने बेचैन करून सोडलंय,
     आपल्याला याने प्रेमात कासावीस करून टाकलंय. 💕

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.03.2023-मंगळवार.
=========================================