Ti...

Started by santosh-patil, September 24, 2010, 01:14:07 PM

Previous topic - Next topic

santosh-patil

ती....

नकळत तिचं हळूच हसणं
लाजून पुन्हा चोरून पहाण
वेड लावून जायचं मनाला
तिचं असं गूढ वागणं

ती यायची पावसाच्या सरीसारखी,
नजरेत एक ओढ असायची
तिला पाहण्याची, जवळ घेण्याची
ती मात्र हसून निघून जायची

मन तिच्या मागं धावायचं
वेडं होऊन तिच्या आठवणीत
झाडांच्या सुकलेल्या पानासारखं
वाऱ्यासोबत फरफटत जायचं

तिचा नकळत झालेला स्पर्शही
अंगावर असंख्य शहारे आणायचा
वाऱ्याची आलेली साधी झुळुकही
मला वादळासारखी वाटायची

चेहरयावर आलेले केस तिचे
आमावस्येच्या गर्द रात्रीसारखे वाटायचे
आणि त्याआड लपलेला चेहरा तिचा
मला पौर्णिमेचा चंद्र वाटायचा

तिचं ते सहज चालणं
चालता चालता केसावरून हात फिरवणं
वेड लावून जायचं मनाला
तिचं असं हे गूढ वागणं
- संतोष पाटील

Chait

mast..algad.. surekh