मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-143-संगणक श्राप कि वरदान

Started by Atul Kaviraje, March 08, 2023, 10:28:40 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला निबंध"
                                     निबंध क्रमांक-143
                                 ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "संगणक श्राप कि वरदान"

     आज संगणक क्रांती मोठ्या प्रमाणात झाली आहे. लहान-मोठे, तरूण-म्हातारे सर्वजण संगणकाच्या वापराने परिचित आहेत. काहीही माहिती हवी असल्यास लगेच संगणकाच्या मदतीने इंटरनेट वर आपण मिळवू शकतो. संगणकाच्या मदतीने मनोरंजन पण खूप चांगले होते. नातेवाईक व मित्र मंडळी सोबत पण आपण व्हिडिओ कॉलिंग तसेच चॅटिंग च्या मदतीने गप्पा करू शकतो. संगणक क्रांती मुळे कामे करणे खूप सोपे झाले आहे. मानवी कार्यक्षमता वाढली आहे. आधीच्या काळात जे कार्य तासनतास खूप साऱ्या लोकाच्या सहायाने केले जायचे ते आता संगणकाच्या साहाय्याने कमी वेळात शक्य आहे.

     आधी काहीही वस्तू घ्यायची म्हटली की बाजारात जाऊन दुकाने शोधावी लागत होती. पण आज संगणकाच्या मदतीने आपण गूगल वर कोणतीही वस्तू शोधू शकतो व घरबसल्या खरेदी करू शकतो. अनेक व्यवसाय संगणकाच्या सहाय्याने ऑनलाईन काम करून पैसे कमवीत आहेत. संगणकाने भरपूर लोकांना घरबसल्या रोजगार मिळून दिला आहे. बिकट परिस्थिती मध्ये घरूनच काम करता येऊ शकते.

     संगणकाच्या साहाय्याने बँकेत न जाता घर बसल्या पैसे पाठवणे शक्य झाले आहे. मनात असलेल्या विचारांना आता संगणकामुळे जगासमोर मांडणे सोपे झाले आहे. ब्लॉगर तसेच यूट्यूब च्या माध्यमाने लोक माहिती देत आहेत व या द्वारे चांगले पैसे देखील कमवीत आहेत. कोणतेही पुस्तक विकत न घेता इंटरनेट वर संगणकाच्या मदतीने आपण वाचू शकतो.

     संगणकाचे बरेच फायदे आहेत पण असे म्हणतात की नाण्याच्या दोन बाजू असतात. म्हणजेच ज्या गोष्टीचे फायदे असतात त्याचे तोटे सुद्धा असतात. संगणकाचे पण तसे तोटे आहेत. जरी संगणकाने लोकांना जवळ आणले आहे तरी मनाने मात्र माणसे दूर झाली आहेत. बऱ्याच लोकांना तासनतास संगणक वापरणे गेम्स खेळणे अश्या वाईट सवयी लागल्या आहेत, या सवयीचा दुष्परिणाम त्याच्या आरोग्यावर होतो. उपयोगापेक्षा जास्त संगणक व इंटरनेटचा वापर केल्याने त्याचे व्यसन लागत आहे. यामुळे तरुणांमध्ये मानसिक तणाव उत्पन्न होत आहे.

     या शिवाय खूप साऱ्या अश्या वेबसाइट्स आहेत ज्यांच्या मुळे मुलांच्या बाल मनावर वाईट परिणाम होत आहे. चांगले वाईट ची समझ नसल्याने बरेच तरुण त्या वेबसाइट्स वाचतात. व याचा दुष्परिणाम त्यांच्या मेंदूवर होतों. संगणकाच्या मदतीने सायबर क्राईम देखील वाढले आहेत. कोणत्याही सरकारी तसेच खाजगी कंपन्यांच्या डेटा चोरी करणे व त्याचा चुकीचा वापर करणे मोठ्या प्रमाणात होत आहे. सायबर क्राईम रोखण्यासाठी सरकार कार्य करीत आहे.

     जसे की आपण पाहिले संगणक व इंटरनेट एकीकडे आपल्यासाठी वरदान आहे तर दुसरीकडे याचे दुष्परिणाम देखील खूप आहेत. म्हणून आपल्याला संगणकाचा वापर कामापुरता व योग्य रीतीने करायला हवा. जर आपण संगणकाच्या गरज असतानाच वापर करू तर भविष्यात संगणकाच्या सहाय्याने आपले जीवन सुखमय होऊ शकेल. देशाची प्रगती देखील योग्य संगणक वापराने शक्य आहे.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                   -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.03.2023-बुधवार.
=========================================