मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-121-भारताला युद्ध करावे लागले तर ?

Started by Atul Kaviraje, March 08, 2023, 10:36:00 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "मला आवडलेला लेख"
                                      लेख क्रमांक-121
                                  ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "भारताला युद्ध करावे लागले तर ?"

                             भारताला युद्ध करावे लागले तर ?--
                            -----------------------------

     मंडळी,
     भारत पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणजे युद्धच वगैरे आता राहिले असे वाटत नाही. पण भारताने असे काही खेळीमेळीचे पाऊल उचलले की पाकिस्तान कडून लगेचच एखाद्या भ्याड हल्ला, अतिरेकी हल्ला किंबा थोडक्यात म्हणजे युद्धजन्य परिस्थिती तयार करण्याची खुमखुमी असतेच. हे आता आपल्याला अंगवळणी पडले आहे. खास करुन नियंत्रण रेषेवर काही ना काही घडामोडी होतातच. मग नेहमी प्रमाणे आपले सरकार चर्चा/वाटाघाडी आणि मग सबुरीचे धोरण घेऊन पुढचा हल्ला होण्याची वाट पहात बसते. पण समजा नजीकच्या भविष्यात खरेच युद्ध झाले तर? अमेरिकेला सुद्धा सध्या कोणते नवे युद्ध नाहीये, चीनला सध्या ताकद दाखवायची खुमखुमी आहे आणि कोणत्याही शेजारी राष्ट्रासोबत त्यांचे ही फारसे प्रेमळ संबंध नाहीत. अशा परिस्थितीत आपल्या उपखंडात भारत पाकिस्तान युद्ध ही जगाला हवी असलेली घटना घडू शकते काय? घडल्यास ते युद्ध कशा प्रकारे होईल आणि भारताचा यावेळी खरच निभाव लागेल का? अंतर्गत कलह, अस्थिर आणि दुबळे सरकार, पाकिस्तानच्या छुप्या युद्धामुळे भारतात एकाचवेळी सीमेवर आणि आतमध्ये असे हे युद्ध लढले जाईल का? कि असे युद्ध आतच सुरु झाल्यास यावेळी सुद्धा त्याला पहिल्यांदा एक गँगवॉर अथवा तत्सम दृष्टीने पाहिले जाईल? तुम्हाला काय वाटते? युद्ध झाल्यास भारतासाठी अंतिम निर्णय काय असेल ?

--चाणक्य
(January 12, 2013)
----------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                     -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.03.2023-बुधवार.
=========================================