हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून-तुला सोडण्याचा मी वेडेपणा केला

Started by Atul Kaviraje, March 09, 2023, 11:09:31 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून"
                           --------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून" या शीर्षकI-अंतर्गत हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध बँड पथक-"a1", यांचे एक भाषांतरित,अनुवादित गाणे. या गाण्याचे शीर्षक आहे- "Crazy For Leaving You"-"तुला सोडण्याचा मी वेडेपणा केला"

                               "तुला सोडण्याचा मी वेडेपणा केला"
                              -------------------------------

"Crazy For Leaving You"
"तुला सोडण्याचा मी वेडेपणा केला"
------------------------------

तुझ्याकडून मी काही खुळ्या गोष्टी ऐकल्या
तुझ्यासाठी त्या मी वेड्यासारख्या अनुभवल्या
मी गुन्हा कधीही नव्हता पाहिला
पुढे जाऊन तू माझा वेळ वाचवला
मी तुझ्यासारखीलI कधीच नव्हतो भेटलो
पण ते तितकसही पुरेसं नव्हतं
कारण मला ते वाटूनही फायद्याचं नव्हतं.

तुला सोडून देताना मी वेडाच असलो पाहिजे
तुला सोडताना मी भ्रमित अन दु:खी असलो पाहिजे
पण माझं हृदयच माझ्याशी असत्य वागू लागलं
मी वेडाच असलो पाहिजे, तुला सोडून जाताना.

मी माझ्या मनातून खेद व्यक्त करणार
तुला रडताना मला नाही पाहवणार
मी अविरत तुझी काळजी वाहतोय
तुझ्यावर गाढ प्रेम मी करतोय
मला माहित नाही मी ते कसं जमवतोय
पण त्यासाठी मी खूप प्रयत्न करतोय
माझ्या भावना मी उघडपणे व्यक्त करतोय.

तुला सोडून देताना मी वेडाच असलो पाहिजे
तुला सोडताना मी भ्रमित अन दु:खी असलो पाहिजे
पण माझं हृदयच माझ्याशी असत्य वागू लागलं
मी वेडा,वेडा, वेडाच असलो पाहिजे, तुला सोडून जाताना.

आणि मला माहितीय मी मूर्खासारखं वागतोय
तुझ्या आठवणी सतत मी काढतोय
पण माझ्या आयुष्यात आणि काहीतरी आहे
आणि ही माझ्या मनातली उघड भावना आहे.

तुला सोडून देताना मी वेडाच असलो पाहिजे
तुला सोडताना मी भ्रमित अन दु:खी असलो पाहिजे
पण माझं हृदयच माझ्याशी असत्य वागू लागलं
मी वेडा,वेडा, वेडाच असलो पाहिजे, तुला सोडून जाताना.

--a1
------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-az-लैरिकस.कॉम)
                    ------------------------------------------

-----संकलक आणि अनुवादक 
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.03.2023-गुरुवार.
=========================================