प्रेमिकेच्याशोधार्थ कविता-शोधतोय मीत्या नवयौवनेला,गेली करून घायाळ माझ्या हृदयालI

Started by Atul Kaviraje, March 09, 2023, 11:19:29 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, हरवलेल्या प्रेमिकेच्या शोधार्थ कविता-गीत ऐकवितो. "ओ हसीना जुल्फों वाली जाने जहाँ, ढूंढ़ती हैं काफ़िर आँखें किसका निशान"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा.  मार्च महिन्याची ही गुरुवार-रात्र आपणास आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(ओ हसीना जुल्फों वाली जाने जहाँ, ढूंढ़ती हैं काफ़िर आँखें किसका निशान)           
-------------------------------------------------------------------------

          "शोधतोय मी त्या नवयौवनेला, गेली करून घायाळ माझ्या हृदयाला !💘"
         ---------------------------------------------------------------

शोधतोय मी त्या नवयौवनेला ,
गेली करून घायाळ माझ्या हृदयाला ! 💖
महफिल सारी दिवाणी झाली,
पाहून, भुलून तिच्या लावण्याला.

शोधतोय मी त्या नवयौवनेला ,
गेली करून घायाळ माझ्या हृदयाला ! 💖
सूर लागले होते तिच्यासारखेच सुंदर,
डोळे शोधताहेत कधीपासून तिला. 👀

नागिणीसम सारखी भिरभिरत होती 💃
पावलात वीजेलाच तोलत होती ⚡️
अशी नव्हती पाहिली नृत्यांगना आधी, 💃
कुठे गेली कुणी सांगेल का मला.

सारी मैफिल तिने गाजवली
रसिकांच्या साऱ्या वाहवा मिळवली
आणि अचानकच मैफिल थांबवून,
पाहता, अर्ध्यावरच पडदा पाडला.

मीही नाही कच्च्या गुरूचा चेला
केव्हातरी सापडेल ती माझ्या नजरेला
माझे प्रेमच तिला फशी पIडेल,
पीळ पाडून गेली ती माझ्या हृदयाला. 💔

माझी धडधड आता वाढत आहे
तिला मी केव्हापासून शोधत आहे
श्वासांनी ऊर धपापू लागलाय,
प्रत्येक गल्लीत मी शोधतोय तिला.

ती मला केव्हातरी सापडेलच
मी काहीतरी जादू करेनच
तिच्यावर मी भुरळ पाडून,
माझ्या कह्यात करेन मी तिला.

कितीशी तू लपून राहशील
या मजनूपासून तू दडून राहशील
हा तुझा न्यारा ढंग मला आवडला,
हा तुझा अजब रंग मला भावला.

या रात्रीची नशा काही औरच आहे
त्यावर तू चांद तारे लावलेच आहे 🌛 🌜 ✨
एक बलIच वाटते आहेस तू मला,
अजून किती भुलवशील तू मला.

जाताना नावही नाही सांगून गेलीस
जाताना पत्ताही नाही ठेवून गेलीस
माझ्या हृदयाचे तुकडे करून जाताना, 💔
काहीच कसं वाटलं नाही तुला.

ही तुझी अदा मला खूप आवडली
तिनेच तर मला तुझ्या नादी लावली
आता या अदेची खाण कुठे सापडेल मला,
कुठे शोधू मी या सौंदर्याच्या खजिन्याला.

आता थांब जरा, नको सतावूस मला
या भरलेल्या मैफिलीत बदनाम करू नकोस मला
तुझी कातिल अदा माझा कत्लच करून गेली.
जाताना चोरूनच नेलस तू माझ्या मनाला. 

शोधतोय मी त्या नवयौवनेला ,
गेली करून घायाळ माझ्या हृदयाला ! 💖
महफिल सारी दिवाणी झाली,
पाहून, भुलून तिच्या लावण्याला.

शोधतोय मी त्या नवयौवनेला ,
गेली करून घायाळ माझ्या हृदयाला ! 💖
सूर लागले होते तिच्यासारखेच सुंदर,
डोळे शोधताहेत कधीपासून तिला. 👀

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.03.2023-गुरुवार.
=========================================