II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-सुविचार आणि शुभेच्छा-1

Started by Atul Kaviraje, March 10, 2023, 09:04:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II   
                           ---------------------------------
       
मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१०.०३.२०२३-शुक्रवार आहे. आज श्री शिवरायांची जयंती आहे. महाराष्ट्रातच नाही तर अवघ्या जगात ज्यांच्या किर्तीचा डंका आजतागायत अजरामर आहे ते शक्तीशाली नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. दरम्यान महाराष्ट्रात शिवजयंती करण्याबाबत दोन गट असल्याचे पाहायला मिळते. काही जण शिवजयंती तारखेनुसार साजरी करतात तर काही जण शिवजयंती तिथीनुसार साजरी करतात. लक्षणीय बाब म्हणजे तिथीनुसार दरवर्षी शिवजयंती १० मार्चला साजरी केली जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवयित्रींनी, शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. वाचूया, छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार आणि शुभेच्छा.

                छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार आणि शुभेच्छा--

     छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यानंतर वीरश्री संचारणार नाही असे होणार नाही. रयतेचा राजा म्हणून लोकांच्या मनामनात छत्रपतींनी अधिराज्य गाजवले आहे. अशा शिवरायांना कधीच विसरता येणार नाही. तुम्हालाही शिवरायांची ही कामगिरी पुढील पिढीपर्यंत जावी असे वाटत असेल तर तुम्ही शिवाजी महाराजांवरील पुस्तकातून माहिती घ्या. या महानायकाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यापेक्षा त्यांचा आदर्श, त्यांचे विचार शिकवून करायला हवी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शिवाजी महाराजांचे विचार (shivaji maharaj thoughts), त्यांच्या जयंतीला पाठवता येतील असे शुभेच्छा संदेश (shivaji maharaj quotes), व्हॉटसअॅप स्टेटस (shivaji maharaj status in marathi), शिवाजी महाराज घोषवाक्य (shivaji maharaj slogan in marathi), शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा (Shivaji Jayanti Wishes In Marathi) तुमच्यासोबत शेअर करत आहोत. शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा (chhatrapati shivaji maharaj quotes in marathi) देऊन तुम्ही हा दिवस साजरा करा. महाराज आणि शिवरायांची शान म्हणजे मराठी भाषा. मराठी भाषा दिन माहिती तर आपल्या सर्वांना आहेच.

--जय जय जय जय भवानी जय जय जय जय शिवाजी.
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

--प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस... सिहांसनाधीश्वर... योगीराज...श्रीमंत
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!

--हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा!

--शिवकाळात सुखात नांदत होती प्रजा.. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा
झेंडा स्वराज्याचा.. झेंडा शिवराज्याचा... गर्जा महाराष्ट्र माझा...
जय शिवराय

--लीनल गावडे
-------------

                        (साभार आणि सौजन्य-मराठी.पॉप xo.कॉम)
                       ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.03.2023-शुक्रवार.
=========================================