II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-सुविचार आणि शुभेच्छा-3

Started by Atul Kaviraje, March 10, 2023, 09:07:07 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II   
                           ---------------------------------
       
मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१०.०३.२०२३-शुक्रवार आहे. आज श्री शिवरायांची जयंती आहे. महाराष्ट्रातच नाही तर अवघ्या जगात ज्यांच्या किर्तीचा डंका आजतागायत अजरामर आहे ते शक्तीशाली नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. दरम्यान महाराष्ट्रात शिवजयंती करण्याबाबत दोन गट असल्याचे पाहायला मिळते. काही जण शिवजयंती तारखेनुसार साजरी करतात तर काही जण शिवजयंती तिथीनुसार साजरी करतात. लक्षणीय बाब म्हणजे तिथीनुसार दरवर्षी शिवजयंती १० मार्चला साजरी केली जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवयित्रींनी, शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. वाचूया, छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार आणि शुभेच्छा.

                छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार आणि शुभेच्छा--

--औरंगजेबाचा कोथळा  निधड्या छातीने काढला... तो शिवबा आमचा कितीही काळ लोटला तरी आम्हा रयतेचा शिवबाच राजा छत्रपति शिवराय'...

--शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला,शेकडो वर्षाची काळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने सगळा आसमंत तेजोमय बनवणारा "शिवसुर्य "...!!!!

--प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक, भोसले कुलदीपक, हिन्दवी साम्राज्य संस्थापक मुघल जन संघारक, श्रीमान योगी,योगिराज,बुद्धिवंत,कीर्तिवंत कुलवंत, नीतिवंत, धनवंत, सामर्थ्यवंत, धर्मधुरंधर, श्रीमंत श्रीमंत श्रीमंत, महाराजाधिराज, छत्रपति शिवाजी महाराज की जय,
जय भवानी। .. जय शिवाजी,
हर हर महादेव.

--विजेसारखी तलवार चालवुन गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा"होऊन गेला.

--ना शिवशंकर... तो कैलाशपती,ना लंबोदर... तो गणपती, नतमस्तक तया चरणी,ज्याने केली स्वराज्य निर्मिती देव माझा एकच तो.. राजा शिवछत्रपती.
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

--मंदिर थरारली, शिवनेरीची तोफ कडाडली वार्‍याची कोवळी झुळूक दर्या खोर्यात दरवळली....जिजाऊ पोटी मराठ्यांचा राज अवतरला सांगत मुकी पाखर हि किलबिलली....नगारा वाजला, शाहिरी साज चढला..डंका डोंगरा आड सांगत सुटला,आता सह्याद्रीवर भगवा फडकणार....!!!!

--मराठ्यांची तलवार शत्रू वर धडकणार....इतिहासाचं पहिलं पान शिव जन्मान लिहील होत,हिरव्या दगडावर आता भगवं रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होत.......
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

--लीनल गावडे
-------------

                        (साभार आणि सौजन्य-मराठी.पॉप xo.कॉम)
                       ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.03.2023-शुक्रवार.
=========================================