प्रेम-कविता - चंद्र-हृदय घेऊन मी आलोय, आवडत्या चांदणीला शोधू लागलोय !

Started by Atul Kaviraje, March 11, 2023, 03:38:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, चंद्र-चांदणीच्या प्रेमाची कविता-गीत ऐकवितो. "चाँद मेरा दिल, चाँदनी हो तुम, चाँद से है दूर, चाँदनी कहाँ"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा.  मार्च महिन्याची ही शनिवार-दुपार आपणास आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(चाँद मेरा दिल, चाँदनी हो तुम, चाँद से है दूर, चाँदनी कहाँ)           
-------------------------------------------------------------------

            "चंद्र-हृदय घेऊन मी आलोय, आवडत्या चांदणीला शोधू लागलोय !"
           ----------------------------------------------------------

चंद्र-हृदय घेऊन मी आलोय, 🌛💝
आवडत्या चांदणीला शोधू लागलोय ! 🌟
निळ्या निळ्या आभाळाचा रात्र-राजा मी,
चंदेरी, शुभ्र होऊन पौर्णिमेला उगवलोय !

चंद्र-हृदय घेऊन मी आलोय, 🌛💝
आवडत्या चांदणीला शोधू लागलोय ! 🌟
शत-तारका प्रकाशती अनंत या आभाळात,
पारखता, निरखता मी थकू लागलोय !

तारके, माझ्यापासून तू दूर का ग आहेस ?
चंद्रापासून चांदणी कधी दूर असते का ?
कधी तुझा रुसवा जाईल, सखे, 😒
कधी तुझा चेहरा हसरा होईल, सखे. 😃

बघ, अशी ढगाआड लपू नकोस
बघ, माझ्याशी लपंडाव खेळू नकोस
ये बाहेर, मला दर्शन दे,
ये पूर्वेस, मला तुझे चंदेरी रूप दिसू दे.

पावलापावलांवर कुणी भेटत असतं नेहमी 👣
आपल्याला कुणी पाहत असतं नेहमी
पण तुझं प्रेम हेच खरं आहे,
तुझ्या डोळ्यातून ते दिसतंय मला नेहमी. 👀

कुणाशी प्रेम करणं हा खेळ नाही, सखे
कुणाला प्रेमात खेळवणं हे योग्य नाही, सखे
पहा, माझं खरं प्रेम तुला दिसेल माझ्या डोळ्यांत, 👀
माझं हृदयच प्रेमाचं अंतिम ठिकाण आहे, सखे. 💖

पहा, तुझ्यासाठी मी चंदेरी मनाने आलोय
शुभ्र, चकाकता पौर्णिमेचा चाँद होऊन आलोय 🌝
चांदणी होऊन हुलकावणी नको देउस,
या चंद्रापासून दूर तू नको राहूस.

पहा, तुझ्यासाठी मी महफिल सजवलीय
क्षितिजावर ती रुपेरी रंगात रंगवलीय
तुझ्या आगमनाची मी सर्व तयारी केलीय,
तुझ्या मार्गावर मी सप्तरंगी रांगोळीही रेखाटलीय.

मी तुझ्या सौंदर्यावर कधीचा फिदा आहे
मी तुझाच होऊन राहीन हा माझा वादI आहे
फक्त एकदाच तू प्रकाशमान हो,
फक्त एकदाच या चंद्र-राजाची तू रात्र-राणी हो. 🌜⭐️

बघ, रात्र कशी बहराला येतेय, प्रिये
या चंद्राला येऊन तू भेट, सखये 🌝
अशी झुरवत नको ठेऊस तू मला,
अश्याने माझी चंद्र-कोरच दिसेल तुला. 🌜

बघ, मावळतीच्या दिशा मंद होताहेत
प्राचीवरती सुवर्ण-अश्व दौडत येताहेत 🌞
थोड्याच वेळात विश्वाचे कार्य सुरु होईल,
तुझे आणि माझे अस्तीत्व नाहीसच होईल.

माझं चंद्र-हृदय तुझंच आहे, सखे 🌛💝
हा हृदय-हक्क तुझाच आहे, तारके ❤
आजवर तुझ्यासाठीच ते मी जपत आलोय,
तुला भेटण्यासाठीच मी अंबरी उजळत आलोय.

आता मुक्तपणे तुझा विहार होऊ दे
या निल गगनात तुझा स्वैर संचार होऊ दे
या पौर्णिमेच्या चंद्राची चांदणी होऊन ये, ✨
या पुनवेच्या चंद्राची तू राणी होऊन ये. 🌝

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.03.2023-शनिवार.
=========================================