प्रियेच्याप्रतिक्षेचीकविता-रात्र अशीच निघून चाललीय,तुझ्या आगमनाची उत्कंठा लागलीय

Started by Atul Kaviraje, March 12, 2023, 12:35:22 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, प्रियेच्या प्रतिक्षेची कविता-गीत ऐकवितो. "खोया-खोया चांद, खुला आसमां, आँखों में सारी रात जाएगी"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा.  मार्च महिन्याची ही रविवार-दुपार आपणास आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(खोया-खोया चांद, खुला आसमां, आँखों में सारी रात जाएगी)           
-------------------------------------------------------------------

           "रात्र अशीच निघून चाललीय, तुझ्या आगमनाची उत्कंठा लागलीय !"
          ----------------------------------------------------------

रात्र अशीच निघून चाललीय, 🌃
तुझ्या आगमनाची उत्कंठा लागलीय !
चंद्रही हरवून गेलाय कुठेतरी, 🌛
चांदणी त्याला जणू सोडूनच गेलीय ! ✨

रात्र अशीच निघून चाललीय, 🌃
तुझ्या आगमनाची उत्कंठा लागलीय !
एकलेपणाचे दुःख मला उमगलंय,
मनाला तुझी हुरहूर लागलीय !

झोप कोसो दूर आहे माझ्यापासून
ही रात्र अशीच बहुधा बीतणार
तुही तिकडे असशील तळमळत,
ही रात्र अशीच झुरत राहणार.

पहा प्रिये, शीतल वारा वाहू लागलाय
रातराणीचा सुगंध पखरू लागलाय
तो मादक सुगन्ध शरीरभर पसरू लागलाय,
तनामनास तो कसा डोलवू लागलाय.

मनाची कळी माझ्या खुलून आलीय 🌹
आमोद, प्रमोद फुलवत राहिलीय 🍀
पण आत कुठेतरी एक खंत आहे अजुनी,
तुला पाहण्याची इच्छा अधुरीच राहिलीय.

तुझी वाट पाहून ती आता मुरझू लागलीय
तुझ्या प्रतीक्षेत तीही झुरू लागलीय
या वातावरणात एक उदासी भरलीय,
ही रात्र अशीच निघून चाललीय.

बघ प्रिये, हे रात्रीचे दृश्य तर पहा
हा चंद्र पहा, या तारका पहा 🌝 ✨
या दोघांचेही रात्री मिलन होतंय,
आपण दोघांना ते एक इशाराच देतंय.

बस हे पाहण्यास तूच नाहीस इथे
चंद्राला चांदणी शेवटी भेटलीच इथे 🌜 ⭐️
सारे कसे आनंदी आहेत, खुश आहेत,
आता सारे एकमेकांचे झाले आहेत.

सखे, ही रात्र अंगांगात भिनत आहे
एक अनोखी खुमारी ती देत आहे
आपुलकीने मला विचारीत आहे,
तुझी प्रिया अजुनी कुठे आहे ?

तू असतीस, तर रात्र आणि खुलली असती
आपली प्रीत तिने चांदण्यात पIहिली असती
तुझा कोमल हात माझ्या हाती असता,
तो चंद्रही तुझा मुख-चंद्र पाहून कोमेजला असता. 🌝 😒

सखे ये, ही रात्र अशीच सरत चाललीय
उदास, खिन्न मनाने कशी निघून चाललीय
माझ्या नयनांना तुझी प्रतीक्षा आहे,
मनातील भावना शब्दरूपात प्रकट होत आहे.

तुझा सारा अट्टाहास मी पुरवत होतो
तुझ्यासाठी तनामनाला मी झुरवत होतो
पण तुझा हट्ट तू काही सोडत नाहीस,
माझ्या विनवणीला तू काही बधत नाहीस.

आता मला अशी नकोस अजमावूस
आता माझी अशी परीक्षा नको पाहूस
माझ्या मनाला दुखवून तू काय मिळवशील, 💔
आता माझा अंत तू नको पाहूस.

ही रात्र अजुनी अधीर आहे
आपल्या दोघांची ती वाट पाहत आहे 🚻
चंद्र, चांदण्या अजुनी आकाशी आहेत, 🌛 ✨
आपले मिलन पाहण्या तेही उत्सुक आहेत. 💑

ये सखे, येऊन माझा एकलेपणा दूर कर
माझ्या मनाची हुरहूर तू दूर कर
तुझ्या आठवणीत ही रात्रही सरत नाहीय,
आज माझ्या डोळ्यांत झोपच नाहीय. 👀

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.03.2023-रविवार.
=========================================