हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून-प्रत्येकवेळी

Started by Atul Kaviraje, March 12, 2023, 09:52:08 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून"
                           --------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून" या शीर्षकI-अंतर्गत हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध बँड पथक-"a1", यांचे एक भाषांतरित,अनुवादित गाणे. या गाण्याचे शीर्षक आहे-"Everytime"-"प्रत्येकवेळी"

                                     "प्रत्येकवेळी"
                                    -------------

"Everytime"
"प्रत्येकवेळी"
--------------

मी पूर्वी होतो तसा नाही राहिलोय
मी आता खूपच बदललोय
मला तिथे जायचं नव्हतं मनापासून
तरी कुणीतरी नेलं मला बळजबरी करून
जर मला माहित असत नक्की काय करायचं
तर तेही मी केलं असतं तुझ्यासाठी
तुझं मन राखण्यासाठी, तुला उत्साहित करण्यासाठी
मी सारं काही केलं असतं केवळ तुझ्यासाठी.

आपल्याला त्या सर्व गोष्टी मिळतील आताही
ज्या केव्हातरी तुझ्या आणि माझ्याच होत्या
आणि त्या नक्कीच मिळतील, पुनरुज्जीवित होतील
आपल्या प्रेमात त्या तेव्हा घडत होत्या.

मला आठवताहेत तुझे ओठ, जेव्हा मी चुंबन घ्यायचो
प्रत्येकवेळी
मला रडूच येतंय, जेव्हा तुझं हसणं पाहायचो
प्रत्येकवेळी
मी जेव्हा डोळे मिटतो, तेव्हा तूच डोळ्यांसमोर असतेस
प्रत्येकवेळी
मी तुझा जेव्हा हात हाती धरायचो
ही माझ्या मनातली अतिशय आवडती गोष्ट असते
जी मला आजही चांगलीच आठवते
प्रत्येकवेळी
आणि मला आता असं फक्त वाटूनच राहिलंय
जेव्हापासून तुझं प्रेम माझ्यापासून दूर गेलंय.

आपल्या नशिबात सर्वच गोष्टी बाजूने नव्हत्या
ज्यांचा आपण विचार केला होता
मी त्या गोष्टींना दूरच केलं होतं
आता तू नाही आहेस माझी साथ देण्यास
झालोय प्रवृत्त त्याचं गोष्टी करण्यास
पण बेबी, मी हे एकटाच नाही करू शकत
तू बरोबर असल्याशिवाय मला हे नाहीच जमत.

आपल्याला त्या सर्व गोष्टी मिळतील आताही
ज्या केव्हातरी तुझ्या आणि माझ्याच होत्या
आणि त्या नक्कीच मिळतील, पुनरुज्जीवित होतील
आपल्या प्रेमात त्या तेव्हा घडत होत्या.

मला आठवताहेत तुझे ओठ, जेव्हा मी चुंबन घ्यायचो
प्रत्येकवेळी
मला रडूच येतंय, जेव्हा तुझं हसणं पाहायचो
प्रत्येकवेळी
मी जेव्हा डोळे मिटतो, तेव्हा तूच डोळ्यांसमोर असतेस
प्रत्येकवेळी
मी तुझा जेव्हा हात हाती धरायचो
ही माझ्या मनातली अतिशय आवडती गोष्ट असते
जी मला आजही चांगलीच आठवते
प्रत्येकवेळी
आणि मला आता असं फक्त वाटूनच राहिलंय
जेव्हापासून तुझं प्रेम माझ्यापासून दूर गेलंय.

आपण ते जीवन पुन्हा जगू
आपले दुःख पुन्हा एकमेकाना सांगू
तू माझ्यावर ठेवला होता विश्वास
आणि मी दाखवत होतो तुझ्यावर अविश्वास
मी तुला कायमचे वचन देतोय
मी तुझा एक उत्तम मित्रच होतोय
मी आपले प्रेम परत आणीन
मी ते सर्व काळ तुझ्यासाठी जपीन.

मला आठवताहेत तुझे ओठ, जेव्हा मी चुंबन घ्यायचो
प्रत्येकवेळी
मला रडूच येतंय, जेव्हा तुझं हसणं पाहायचो
प्रत्येकवेळी
मी जेव्हा डोळे मिटतो, तेव्हा तूच डोळ्यांसमोर असतेस
प्रत्येकवेळी
मी तुझा जेव्हा हात हाती धरायचो
ही माझ्या मनातली अतिशय आवडती गोष्ट असते
जी मला आजही चांगलीच आठवते
प्रत्येकवेळी
आणि मला आता असं फक्त वाटूनच राहिलंय
जेव्हापासून तुझं प्रेम माझ्यापासून दूर गेलंय.

मला आठवताहेत तुझे ओठ, जेव्हा मी चुंबन घ्यायचो
प्रत्येकवेळी
मला रडूच येतंय, जेव्हा तुझं हसणं पाहायचो
प्रत्येकवेळी
मी जेव्हा डोळे मिटतो, तेव्हा तूच डोळ्यांसमोर असतेस
प्रत्येकवेळी
मी तुझा जेव्हा हात हाती धरायचो
ही माझ्या मनातली अतिशय आवडती गोष्ट असते
जी मला आजही चांगलीच आठवते
प्रत्येकवेळी
आणि मला आता असं फक्त वाटूनच राहिलंय
जेव्हापासून तुझं प्रेम माझ्यापासून दूर गेलंय.

--a1
------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-az-लैरिकस.कॉम)
                   ------------------------------------------

-----संकलक आणि अनुवादक 
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.03.2023-रविवार.
=========================================