हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून-मी तुझ्या प्रेमात नाही

Started by Atul Kaviraje, March 13, 2023, 11:59:41 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून"
                           --------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून" या शीर्षकI-अंतर्गत हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध बँड पथक-"10cc", यांचे एक भाषांतरित,अनुवादित गाणे. या गाण्याचे शीर्षक आहे- "I'm Not In Love"- "मी तुझ्या प्रेमात नाही"

                               "मी तुझ्या प्रेमात नाही"
                              ---------------------

"I'm Not In Love"
"मी तुझ्या प्रेमात नाही"
--------------------

मी तुझ्या प्रेमात नाही
तर, हे विसरू नकोस
हा एक मूर्ख, नासमझ होता टप्पा
या नुसत्याच होत्या केवळ गप्पा
ज्यातून जात होतो मी आजवर.

आणि म्हणूनच मी तुझ्याशी संपर्क केला
आणि यासाठीच मी तुला फोन केला
मला चुकीचं नकोस समजू
तू जिंकलस असं नकोस समजू
तुला ते मिळालंय असं नकोस समजू
नाही मी प्रेमात नाहीय
नाही, मी तुझ्या प्रेमात नाहीय
नाही, नाही.

याच कारण, मला तुला पाहावंसं वाटतंय
पण याचा अर्थ सर्व सुरळीत नाही होतंय
तुझ्याशी माझं परत एक नातं जुळतंय
म्हणून जरी मी तुला फोन केला
तरी आकांडतांडव जराही करू नकोस
तुझ्या मित्रांना आपल्या दोघांबद्दल सांगूही नकोस
नाही मी प्रेमात नाहीय
नाही, मी तुझ्या प्रेमात नाहीय
नाही, नाही.

याच कारण, मी तुझं छायाचित्र काढलंय
ते मी माझ्या भिंतीवर लटकवलंय
त्याने त्या  भिंतीवरच्या ओंगळ डागाला झाकलंय
मला तुला ते परत करण्याबाबत विचारू नकोस
मला माहितीय, मला माहितीय, मला ते अधिक महत्त्वाचे नाहीय
नाही मी प्रेमात नाहीय
नाही, मी तुझ्या प्रेमात नाहीय
नाही, नाही.

याच कारणासाठी, तू खूप काळ थांबशील माझ्यासाठी
तू खूप काळ थांबशील
तू खूप काळ थांबशील माझ्यासाठी
तू खूप काळ थांबशील.

मी तुझ्या प्रेमात नाही
तर, हे विसरू नकोस
हा एक मूर्ख, नासमझ होता टप्पा
या नुसत्याच होत्या केवळ गप्पा
ज्यातून जात होतो मी आजवर.

आणि म्हणूनच मी तुझ्याशी संपर्क केला
आणि यासाठीच मी तुला फोन केला
मला चुकीचं नकोस समजू
तू जिंकलस असं नकोस समजू
तुला ते मिळालंय असं नकोस समजू
नाही मी प्रेमात नाहीय
नाही, मी तुझ्या प्रेमात नाही...

--10cc
--------

                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ-अनडिस्कवर म्युझिक.कॉम)
                --------------------------------------------------

-----संकलक आणि अनुवादक 
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.03.2023-सोमवार.
=========================================