प्रिया-सौंदर्य कविता-या बिंदीने तुझं रूप निखरलंय,तुझं सौंदर्य पहा अधिकच बहरलंय !

Started by Atul Kaviraje, March 13, 2023, 12:22:44 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, प्रियेच्या सौंदर्याचे वर्णन करणारी कविता-गीत ऐकवितो. "तेरी बिंदिया रे आय हाय, तेरी बिंदिया रे"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा.  मार्च महिन्याची ही सोमवार-दुपार आपणास आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे- (तेरी बिंदिया रे आय हाय, तेरी बिंदिया रे)           
----------------------------------------------------

            "या बिंदीने तुझं रूप निखरलंय, तुझं सौंदर्य पहा अधिकच बहरलंय !"
           ------------------------------------------------------------

या बिंदीने तुझं रूप निखरलंय,
तुझं सौंदर्य पहा अधिकच बहरलंय !
हा इवलासा दागिना नजर खेचतोय,
तूझा शृंगार तो परिपूर्ण करतोय.

या बिंदीने तुझं रूप निखरलंय,
तुझं सौंदर्य पहा अधिकच बहरलंय !
ही टिकली तुझ्या माथ्यावरली,
सखे, त्यात तुझी अलग अदा पाहतोय.

     इतकं रोखून नको पाहूस माझ्याकडे
     इतकं जोखून नको घेऊस मला तू गडे
     ही बिंदी नाही, तर जादूची टिकली आहे,
     तुझी झोपच उडवून नेईल ती पलीकडे.   

तुझ्या बिन्दीत मी पूर्ण चंद्र पाहतोय 🌝
तुझ्या बिन्दीत मला चांदण्यांचा भास होतोय ✨
कधी कधी मला ती शीतल वाटतेय,
तर कधी ती मला जणू अंगारचं भासतेय.

तुझे झुमकेही पहा आभा फाकताहेत
तुझ्या दोन्ही कर्णात ते चमकून राहताहेत
आता तर तुझं सौंदर्य अIणिकच वाढलंय,
झुमका तुझ्या कानांना तोलू लागलाय.

     साजणा, जास्त प्रेमात पडू नकोस झुमक्यांच्या
     या माझ्या झुमक्या तुला झुलवतच ठेवतील
     तुझी झोप तर आधीच उडवलीय या बिंदीने,
     हे माझे झुमकेही तुझी चैनच उडवतील.

     इतक असूनही तूच मला प्रिय आहेस 💘
     तूच माझा खरा दागिना आहेस, सख्या
     तुझ्यामुळेच मी सजते धजते आहे,
     तुझ्यामुळेच मला निखार आलाय, प्रिया.

     तुझ्यावर मी इतकं प्रेम करतेय
     पण तुझी नजर तर भटकतच आहे
     तुला मी सांगतेय हे परोपरीने,
     पण तुझे डोळे काही भलतेच शोधत आहे. 👀

बरं, तुझं सारं म्हणणं मानलं मी
मग तुझ्या बांगडया काय बरं सांगताहेत ?
तुझ्या हातात त्या खनकताहेत, खुळखुळताहेत,
माझे सारे लक्ष त्याच वेधताहेत.

     अरे त्या तर तुझंच नाव घेताहेत
     त्या मधुर लयीत तुला साद देताहेत
     विचारताहेत, कधी होणार तू त्याची,
     त्याच्या अंगणाला ओढ आहे तुझ्या पावलांची. 👣

तू जेव्हापासून आलीस माझ्या आयुष्यात
तू जेव्हापासून आलीस माझ्या जीवनात
माझ्या अंगणात बघ आलीय बहार,
छुमक छुमक पैंजणांनी सजलीय माझी दुपार.

तुला या दागिन्यांची काही गरज नाही
तू आहेस तशीच मला हवी आहेस
या दागिन्यांशिवायही तू सुंदर दिसतेस,
तू आहेस तशीच मला हवी आहेस.

     सख्या मी तुझीच होऊन राहणार आहे
     तुझं अंगण माझी वाट पहात आहे
     आता हे नातं कधीच तुटणार नाही,
     तुझं अंगण आता कधीच सुटणार नाही.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.03.2023-सोमवार.
=========================================