मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-238

Started by Atul Kaviraje, March 13, 2023, 10:20:14 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                मला आवडलेल्या चारोळ्या
                                  चारोळी क्रमांक-238
                               ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --नवं-चारोळीकार  नवऱ्या  बायकोच्या  प्रेमाची  अजून  एक  चारोळी  आपणास  सांगत  आहे . तो  म्हणतोय , त्याच्या  चारोळीतील  पती  आपल्या  पत्नीस  म्हणतोय , तू  जेव्हा  घरी  नसतेस , तेव्हा  घर  मला  खायला  उठतं , मला  अगदी  एकटं  वाटू  लागतं . अश्यावेळी  तुझं  घरी  असणं  हे  कोणत्याही  गोष्टींपेक्षा अति  प्रिय , परम  प्रिय  वाटू  लागतं . तुझ्या  प्रेमानेच  मला  माझ्या  आयुष्याची  दिशा  गवसली  आहे . नाहीतर  आतापावेतो  माझी  दशाच  झाली  असती . आपल्यात  कितीही  भांडणे  झाली , वाद  झाला  तरी  आपण  पुन्हा  एक  होतो , तुझ्यापासून  मी  कधीही  दूर  राहू  शकत  नाही . पत्नी  प्रिये , तू  सतत  माझ्याबरोबर  राहा , माझ्या  सोबत  राहा . हीच  माझी  इच्छा  आहे . 

==========================
तू घरी नसतेस तेव्हा तुझी उणीव भासते
बायको तू मला माझ्या परिही प्रिय वाटतेस
प्रेमाने तुझ्या मला दिली आयुष्याला दिशा
तू नसशील तर आयुष्याची होईल दशा
कितीही भांडलो तरी नाही होऊ शकत तुझ्यापासून दूर
सतत तू सोबत असावे हीच माझी इच्छा
==========================

--नवं-चारोळीकार
----------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-क्रिएटर मराठी.कॉम)
                 --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.03.2023-सोमवार.
=========================================