कुमार मराठी विश्वकोश-अडुळसा (Malabar nut tree)

Started by Atul Kaviraje, March 13, 2023, 10:50:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "कुमार मराठी विश्वकोश"
                               -----------------------


मित्र/मैत्रिणींनो,

     "कुमार मराठी विश्वकोश", या विषया-अंतर्गत आज वाचूया कुमारांसाठी एक महत्त्वाचा शैक्षणिक लेख. या लेखाचा विषय आहे- अडुळसा (Malabar nut tree).

                            "अडुळसा (Malabar nut tree)"
                           --------------------------------

     अडुळसा ही अ‍ॅकँथेसी कुलातील सदाहरित झुडूप स्वरूपाची औषधी वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव अ‍ॅधॅटोडा व्हॅसिका आहे. भारत, श्रीलंका, म्यानमार व मलेशिया या देशांत ती आढळते. ही वनस्पती महाराष्ट्रात कोकण आणि दख्खनच्या पठारावर शेताच्या कडेने लावतात.अडुळसा सु. १.२-२.४ मी. उंच वाढते. पाने साधी, मध्यम आकाराची व लांबट असतात. ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान फांदीच्या टोकास फुलोरा येतो. फुले पांढरट रंगाची असतात. फळ लांबट व टोकदार असते.

     अडुळसाची मुळे, खोडाची साल, पाने, फुले व फळे औषधांत वापरली जातात. कफ, दमा, खोकला आणि विविध श्वसन आजारांवर अडुळसा औषध मोठ्या प्रमाणावर वापरतात. साधारणपणे २००० वर्षांपूर्वीपासून या औषधी वनस्पतीचा उपयोग केला जात असावा, असे आयुर्वेदातील उल्लेखांवरून दिसते. अडुळशापासून आयुर्वेदीय पद्धतीने अनेक औषधे तयार केली गेली आहेत. पानांचा रस अतिसारात गुणकारी असतो. त्याचा रस, मध, सुंठ, मिरी व पिंपळी यांचे मिश्रण कफ व कास यांवर देतात. पानांत वासिसाईन हे अल्कलॉइड आणि अ‍ॅडॅथोडिक आम्ल असते. हृदयाच्या आजारांवरही या वनस्पतीचा उपयोग केला जातो.

======================
अडुळसा (Malabar nut tree)
Post published:16/09/2019
Post author:नरेंद्र देशमुख
Post category:कुमार विश्वकोश / वनस्पती
======================

--मराठी विश्वकोश
----------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-कुमार मराठी विश्वकोश)
                  ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.03.2023-सोमवार.
=========================================