आयुष्याशी केलेल्या मैत्रीची कविता-मी आयुष्याशी मैत्री केली,आणि ती जीवनभर निभावली

Started by Atul Kaviraje, March 14, 2023, 06:45:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, आयुष्याशी केलेल्या मैत्रीची कविता-गीत ऐकवितो. "ज़िंदगी का साथ निभाता चला गया, हर फ़िक्र को धुँएं में उड़ाता चला गया"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा.  मार्च महिन्याची ही मंगळवार-संध्याकाळ आपणास आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे- (मैं ज़िंदगी का साथ निभाता चला गया, हर फ़िक्र को धुँएं में उड़ाता चला गया)           
-------------------------------------------------------------------------

                 "मी आयुष्याशी मैत्री केली, आणि ती जीवनभर निभावली !"
                ---------------------------------------------------

मी आयुष्याशी मैत्री केली,
आणि ती जीवनभर निभावली !
जीवनाशी मी हातमिळवणी केली, 🤝
सुखदुःखाची मी सांगडच घातली !

मी आयुष्याशी मैत्री केली,
आणि ती जीवनभर निभावली !
जीवनाशी माझ्या मी तडजोडच केली,
जगण्याची मला एक ओढच लागली !

चिंता नाही, काही काळजी नाही
आजची नाहीच, उद्याचीही चिंता नाही
मस्तमौला मी, मस्त फकीर मी,
या चिंतेच्या धुराला हवेत उडवत राही.

झाले गेले सारे काही विसरून गेलो
परत फिरून तिथे मी नाही आलो
उदासी, मरगळ सारी दूर फेकून दिली, 😒
उत्साहाची, उमेदीची दरी मी जवळ केली. 😃

दुःखाच्याही मी पलीकडे गेलो
जे नश्वर आहे त्यात मी नाही रमलो
दुःख नाहीच, उलट उत्सवच मनवला, 🤔
मी आयुष्याला माझा दोस्तच बनवला.

मिळालं, नाही मिळालं, अफसोस नाही केला
साऱ्या गोष्टींना सोसत, सहत मार्ग आक्रमिला
जे मिळालं त्यालाच नशीब समजलो,
जे हरवलं ते विसरूनच पुढे चाललो.

उदासी आणि ख़ुशी जीवनाचे एक अंग 😒 😊
हास्यात आणि रुदनात भरलेत अनेक रंग 😃 😢
त्या साऱ्यांना पार करून मी गेलो,
या टप्प्यावर मी स्वतःला घेऊन आलो .

जो येईल तो दिवस माझा केला
कालचा दिवस कालच निघून गेला
भविष्याची नाही चिंता, उद्याचे काय माहित ?
बस दिसेल त्या रस्त्याने पुढे जात राहिलो. 🏞

मी अन आयुष्य अजुनी एकत्र चालतोय 👣
एकमेकाना एकमेकांचे अनुभव सांगतोय
आता मृत्यूचे भय मला सतावत नाही,
जीवनाकडून मी जगण्याचे रहस्य ऐकतोय.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.03.2023-मंगळवार.
=========================================