मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-239

Started by Atul Kaviraje, March 14, 2023, 10:25:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 मला आवडलेल्या चारोळ्या
                                    चारोळी क्रमांक-239
                                ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --नवं-चारोळीकार  आज  पती-पत्नीच्या , किंवा  प्रेमी-प्रेमिकेच्या  रागातही  प्रेम  कसं  असतं , हे  या   चारोळीतून  आपणास  सांगत  आहे . तो  म्हणतोय , त्याच्या  चारोळीतील  प्रियकर  आपल्या  प्रियेस  म्हणतोय , जर  का  तू  एखादी  चूक  केलीस , किंवा  तुझ्या  हातून  काही  वावगं  घडलं  तरी  मला  तुझा  राग  कधीही  येत  नाही , तुझ्यावर  मी  कधीही  रुसत  देखील  नाही . माझं  तुझ्यावर  एवढं  प्रेम  आहे  की , मला  तुला  ओरडताही  येत  नाही . आणि  नेमकं  हेच  तुला  कळून  येत  नाही . तुला  ते  कसं  सांगावं  याच  विचारात  मी  असतो . काय  करावं  आणि  काय  करू  नये  याच  विवंचनेत  मी  रोज  पडतो .

======================
तुझ्यावर रागावणं देखील जमत नाही,
तुझ्यावर रुसन देखील जमत नाही,
एवढे प्रेम आहे तुझ्यावर की,
तुझ्यावर ओरडणे सुद्धा मुश्किल आहे.
प्रेम आहे तुझ्यावर हे तुला समजत कसं नाही..
काय करावे, काय नाही करावे??
हाच रोज विचार असे..
======================

--नवं-चारोळीकार
----------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-क्रिएटर मराठी.कॉम)
                 --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.03.2023-मंगळवार.
=========================================