डफली-घुंगरूंची प्रेम कविता-तुझ्या डफलीने मला वेड लावले, मी आज पायात घुंगरू बांधल

Started by Atul Kaviraje, March 16, 2023, 01:53:11 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, डफली आणि घुंगरूंची प्रेम कविता-गीत ऐकवितो. "डफ़ली वाले डफ़ली बजा, मेरे घुँघरू बुलाते हैं आ, मैं नाचूँ तू नचा"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा.  मार्च महिन्याची ही गुरुवार-दुपार आपणास आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे- (डफ़ली वाले डफ़ली बजा, मेरे घुँघरू बुलाते हैं आ, मैं नाचूँ तू नचा)
--------------------------------------------------------------------------
           
              "तुझ्या डफलीने मला वेड लावले, मी आज पायात घुंगरू बांधले !"
             ---------------------------------------------------------

तुझ्या डफलीने मला वेड लावले,
मी आज पायात घुंगरू बांधले ! 👣
तुझ्या डफलीच्या ठेक्यावर पाय थिरकले, 💃
छम छम आवाजाने आसमंत निनादले !

तुझ्या डफलीने मला वेड लावले,
मी आज पायात घुंगरू बांधले ! 👣
तू वाजव, तू ताल धर, तू चाल घे,
पैंजण घालून मी आज मनसोक्त नाचले ! 💃

तुझी डफली नाही तर माझे नृत्य कसले ?
डफलीच्या ठेक्याशिवाय बघ माझे पैंजण रुसले 😒
दोन्हींचे एकमेकांशिवाय जमत नाही,
दोन्हींशीवाय गाण्याचा तIळ बसत नाही

या दोन्हीमुळे आपलं मन जुळतंय, सख्या 💕
तुला आणि मला ते जवळ आणतंय, सख्या 🚻
आपले मन जुळले, आपले विचार जुळले,
आणि आपल्या प्रेम-गाण्याचे सरगम पूर्ण झाले. 🎼

आता माझं मन तुझंच झालंय, लाडक्या
आता मी तुझीच आहे रे, प्रिया
तू सूर घे, तू गा, तू नाचव,
तुझ्याच तालावर मी नाचतेय, सख्या. 💃

तुझ्या डफलीच्या आवाजाने मी धावत येईन
तुझ्या डफलीच्या ठेक्यावर माझे पाय थिरकतील 👣
माझे घुंगरू तुझ्या डफलीचा नाद ऐकतील,
आपोआपच मग तुझ्याकडे ते ओढले जातील.

तुझी डफली डम डम करते आहे
माझी पायल छम छम करते आहे
तुझी डम डम, माझी छम छम एक होऊन,
वातावरणात ते एक रंग भरत आहेत.

तुझा ठेका जोर धरतोय, प्रिया
माझा पदन्यास ताल धरतोय, सख्या 💃
थकूनच गेलेय मी, थोडंसं हळू,
घुंगरू तुटून लागतील मग गळू.

तुझे बोलके हसरे डोळे मला पाहताहेत 👀
हसत हसत ते माझ्या मनाचा वेध घेताहेत 💘
तुझ्या डफलीच्या ताल सुरावर मला डोलवत,
मला ते तुझ्याकडे आकृष्ट करताहेत.

जगाला दाखवून देऊ आज आपण 👍
प्रेमात कसं असतं ते समर्पण
तू वाजव, मला गुंग कर, मला मदहोश कर,
मला नाचव, मला डोलव, मला बेहोष कर. 💃

तुझ्या डफलीने आज जादूच केली, प्रिया
वर घुंगरूंनी त्याला साथ दिली, प्रिया
डफलीशिवाय घुंगरू काय कामाचे ?
छम छम काम करतेय, डफलीला साथ देण्याचे.

आपल्या प्रेमास हे दोघे कारणीभूत आहेत
तुझी डफली माझे पैंजण साथ साथ आहेत
तुझ्या माझ्या प्रेमाची ते साक्ष देताहेत, 💑
डम डम आणि छम छम ने आपली मने जुळताहेत. 💕

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.03.2023-गुरुवार.
=========================================