प्रेमातल्या नाराजीवर कविता-गीत-त्यांची नाराजगी समजू शकते, त्यांची उदासी पाहू शकत

Started by Atul Kaviraje, March 17, 2023, 05:30:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, प्रेमातल्या नाराजीवर कविता-गीत ऐकवितो. "वो हैं ज़रा खफा ख़फा, तो नैन यूँ चुराए हैं"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. मार्च महिन्याची ही शुक्रवार-संध्याकाळ आपणास आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे- (वो हैं ज़रा खफा ख़फा, तो नैन यूँ चुराए हैं)
-----------------------------------------------------         

                 "त्यांची नाराजगी समजू शकते, त्यांची उदासी पाहू शकते !"
                ---------------------------------------------------

त्यांची नाराजगी समजू शकते, 😒
त्यांची उदासी पाहू शकते ! 😒
असं काय घडलंय विपरीत,
की त्यांची खप्पI मर्जी होऊ शकते ! 🤞

त्यांची नाराजगी समजू शकते, 😒
त्यांची उदासी पाहू शकते ! 😒
त्यांना मनवायचा प्रयत्न करतेय,
समजून घेण्याचा प्रयास करतेय !

माझ्याडूनच बहुधा काही आगळीक घडली असावी
मी चुकून त्यांची नजर चुकवली असावी
ते बोलावताहेत, ते काही सांगताहेत,
माझ्याकडूनच चुकून नजर अंदाजी झाली असावी.

माझं वागणं त्यांना पटत नाहीय
माझं वर्तन त्यानं आवडत नाहीय
मला ते जवळ बोलावत आहेत,
म्हणताहेत, तू मला खूप आवडते आहेस.

माझं तुझ्याशी काहीही वैर नाहीय
माझी तुझ्याबद्दल काहीही शिकायत नाहीय
अशी रडत राहू नकोस, अशी उदास होऊन नकोस, 😂 😒
मला ते परोपरीने विनवीत आहेत. 🙏

फुलांनाही तुझा गंध मिळून जाईल 🌹 🥀
ही रात्रही मग रंगात मिसळून राहील 🌃
तुझे केस मोकळे केले मी जर,
बघ, हा नजाराचं बदलून जाईल.

या विशाल गगनाच्या छताखाली
तुझी साथ मला दीर्घकाळ आहे
असIच तुझा सहवास मिळूदे सूर्योदयापर्यंत, 🌄
मला ते प्रेमाचा किरण दाखवीत आहेत.

माझ्यावर अशी नाराज होऊ नकोस 😒
मला अशी तू सतावू नकोस
तू उदास झालीस तर मीही होईन नाराज, 😒
माझ्यावर ऐतबIर ठेव, तुझा अजुनी आहे का ऐतराज ?

आता वर पहा, नजरेला नजर मिळू दे 👀
छातीतली धडधड माझ्या शांत होऊ दे
प्रेमाने एकवार पहा माझ्याकडे,
माझी नाराजगी केव्हाच दूर झालीय, गडे.

आता आपण नाराज नाही एकमेकांवर 
विश्वास ठेव आपल्या प्रेमावर 💕
ते माझी उदासी दूर करत होते,
आपल्या लाघवी बोलण्याने मला जवळ घेत होते, 💑

आता आमच्या नाराजीचे काहीच कारण नाहीय
ही नाराजी आता इतराजीत बदललीय
ही सारी प्रेमाचीच जादू होती,
प्रेमानेच ही सारी किमया केली होती. 💘

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.03.2023-शुक्रवार.
=========================================