१९-मार्च-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, March 19, 2023, 09:40:06 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०३.२०२३-रविवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                    "१९-मार्च-दिनविशेष"
                                   -------------------

-: दिनविशेष :-
१९ मार्च
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००१
वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळविला. कसोटी सामन्यांत ५०० बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.
१९३२
सिडनी हार्बर ब्रिज
'सिडनी हार्बर ब्रिज' सुरू झाला.
१९३१
अमेरिकेतील नेवाडा राज्यात जुगाराला कायदेशीर मान्यता मिळाली.
१८४८
लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या 'प्रभाकर' या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले.
१६७४
शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्‍नी काशीबाई यांचे निधन
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९३८
सई परांजप्ये
सई परांजप्ये – बालनाटय लेखिका, पटकथालेखिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि नामवंत चित्रपट दिग्दर्शिका. स्पर्श, कथा, चश्म-ए-बद-दूर इ. पारितोषिक विजेत्या चित्रपटांच्या दिग्दर्शिका, पद्मभूषण (२००६), राज्यसभा सदस्य
१९३६
ऊर्सुला अँड्रेस
ऊर्सुला अँड्रेस – स्विस अभिनेत्री आणि मॉडेल
१९००
जीन फ्रेडरिक जोलिओट – मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक (१९३५) मिळवणारा फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक
(मृत्यू: १४ ऑगस्ट १९५८)
१८९७
शंकर विष्णू तथा 'दादा' चांदेकर – चित्रपट संगीतकार
(मृत्यू: ? ? ????)
१८२१
सर रिचर्ड बर्टन – ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर
(मृत्यू: २० आक्टोबर १८९०)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००८
आर्थर सी. क्लार्क
सर आर्थर सी. क्लार्क – विज्ञान कथालेखक व संशोधक, भविष्यवेत्ते
(जन्म: १६ डिसेंबर १९१७ - माइनहेड, सॉमरसेट, इंग्लंड)
२००२
नरेन ताम्हाणे – यष्टीरक्षक आणि फलंदाज
(जन्म: ४ ऑगस्ट १९३१)
१९९८
इ. एम. एस. नंबूद्रीपाद – केरळचे मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते
(जन्म: १३ जून १९०९)
१९८२
जीवटराम भगवानदास तथा 'आचार्य' कॄपलानी – स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी
(जन्म: ११ नोव्हेंबर १८८८)
१८८४
केरुनाना लक्ष्मण छत्रे – आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य
(जन्म: १६ मे १८२५)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.03.2023-रविवार.
=========================================