दोन फुलं..

Started by mkapale, March 20, 2023, 10:54:54 AM

Previous topic - Next topic

mkapale

फुल देतांना एकमेकांना आम्ही त्या दिवशी
नकळत एका नात्याची वाटचाल सुरु झाली कशी

पहिल्या नजरेतली ती देवाण घेवाण
बांधून गेली मायेची गाठ दोघात छान

अनोळखी कोणीतरी आपल्याला जिंकून जातं
मन सतत कसं काय तिचाच विचार करत राहतं

दोन फुलंच नाही तर दोन हृदयांची अदलाबदल
सगळं हरवून सुध्द्धा, वाटत होतं सगळं झालंय सफल

त्या फुलाचा सुगंध रोज मी अंतरंगात सामावतोय
पुस्तकात दडलेल्या पाकळ्यांत आमची कहाणी वाचतोय

तिच्या डोळ्यात दिसलं...प्रेम प्रेम म्हणतात ते हेच असेल
तर...आता ते तिलाही रोज माझ्या डोळ्यात दिसेल..