२०-मार्च-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, March 20, 2023, 10:04:45 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२०.०३.२०२३-सोमवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                    "२०-मार्च-दिनविशेष"
                                   --------------------

-: दिनविशेष :-
२० मार्च
जागतिक चिमणी दिन
World Sparrow Day
ट्युनिशियाचा स्वातंत्र्य दिन
जागतिक मौखिक आरोग्य दिन
World Oral Health Day
आंतरराष्ट्रीय फ्रेन्च भाषा दिवस
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९५६
ट्युनिशियाला (फ्रान्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.
१९१७
महाडचा 'चवदार तळे' सत्याग्रह
१९१६
अल्बर्ट आइन्स्टाईनने सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला.
१८५४
रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना झाली. या पक्षाला 'ग्रँड ओल्ड पार्टी' असेही म्हणण्यात येते.
१६०२
डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९८७
कंगना राणावत – सिनेकलाकार
१९६६
अलका याज्ञिक – पार्श्वगायिका
१९२०
वसंत कानेटकर – नाटककार
(मृत्यू: ३१ जानेवारी २०००)
१९०८
सर मायकेल रेडग्रेव्ह – ब्रिटिश अभिनेता
(मृत्यू: २१ मार्च १९८५)
१८२८
हेन्‍रिक इब्सेन – नॉर्वेजियन नाटककार, दिग्दर्शक आणि कवी
(मृत्यू: २३ मे १९०६)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०१५
शाहीर साबळे
कृष्णराव गणपतराव साबळे तथा 'शाहीर' साबळे – महाराष्ट्र शाहीर. 'महाराष्ट्राची लोकधारा' या आपल्या कार्यकमातून लावणी, कोकेवाला (ग्रामीण भागात सारंगीसारखे वाद्य वाजवून देवादिकांची आख्याने गाणारा), बाल्यानृत्य (मुंबईत उपाहारगृहांत, धनिकांकडे, तसेच चाळींतील लोकांकडे कामाला असलेल्या कोकणी गड्यांचे–बाल्यांचे–नृत्य), कोळीनृत्य, गोंधळीनृत्य, मंगळागौर, वाघ्यामुरळी, वासुदेव, धनगर इत्यादींचे जिवंत दर्शन ते घडवत असत. या कार्यक्रमाला अफाट लोकप्रियता मिळाली होती
(जन्म: ३ सप्टेंबर १९२३)
१९५६
बा. सी. मर्ढेकर – मराठी नवकाव्याचे प्रणेते
(जन्म: १ डिसेंबर १९०९)
१९२५
लॉर्ड कर्झन – ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय
(जन्म: ११ जानेवारी १८५९)
१७२७
सर आयझॅक न्यूटन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. गणितातील 'कलन ' (Calculus) या शाखेचे जनक
(जन्म: २५ डिसेंबर १६४२)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.03.2023-सोमवार.
=========================================