प्रेम-कविता-मदमस्त डोळे पाहून मी मदहोश झालोय, तुझ्या एक नजरेने मी बेहोष झालोय !

Started by Atul Kaviraje, March 20, 2023, 10:21:41 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, प्रियेच्या डोळ्यांवर कविता-गीत ऐकवितो. "कितना प्यारा वादा है इन मतवाली आँखों कI,इस मस्ती में सूझे ना क्या कर डालूँ हाल मोहे सम्भाल"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. मार्च महिन्याची ही सोमवार-रात्र आपणास आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे- (कितना प्यारा वादा है इन मतवाली आँखों कI,इस मस्ती में सूझे ना क्या कर डालूँ हाल मोहे सम्भाल)
-------------------------------------------------------------------------

   "मदमस्त डोळे पाहून मी मदहोश झालोय, तुझ्या एक नजरेने मी बेहोष झालोय !"
  ---------------------------------------------------------------------

मदमस्त डोळे पाहून मी मदहोश झालोय, 👀
तुझ्या एक नजरेने मी बेहोष झालोय !
तुझ्या डोळ्यांत मी प्रेमाचा पाझर पाहीला,   
वाहणारा, मायेचा असा निर्झर पाहीला.

मदमस्त डोळे पाहून मी मदहोश झालोय, 👀
तुझ्या एक नजरेने मी बेहोष झालोय !
माझी अवस्था आज मद्यधुंद होतेय,
कधी नव्हे तो आज मी बेकाबू झालोय !

या डोळ्यांत मला आज प्रेम दिसलंय ❤️‍
या नजरेत मला आज आपलेपण गवसलंय
या डोळ्यांनी आज प्रेमाचा वादI केलाय,
प्रेम कायम निभावण्याचा शब्दच दिलाय.

तुझी अदा पाहून माझा तोलच सुटतोय
तुझे लावण्य पिऊन मी बेतालच होतोय
मला सांभाळ, माझ्याकडून काही विपरीत घडेल,
मला आवर, माझ्याकडून काही आगळेच घडेल.

     प्रिया, उजेड असो वा असो अंधार
     हा तुझा धरलेला हात नाही सुटणार 🚸
     तुझ्याशिवाय मला कुणीच नाही,
     तू माझी साथ नाही का निभावणार ?

अगं, तुझ्या गोऱ्या रंगाने मला पागल केलंय
प्रिये, तुझ्या या अदेने मला तुझ्या नIदी लावलंय
सांग माझा तोल कसा बरं राहील ?
सांग माझे पाऊल जमिनीवर स्थिर कसे राहील ? 💃

वर्षानुवर्षे मी तुझ्यासाठी तरसत होतो
तू मिळण्यासाठी मी माझं मन जाळत होतो
तू मला मिळालीस, माझं मन शांत झालं,
तुझ्या पापण्यात मला शीत प्रेम-जल मिळालं.

तू माझ्यावर प्रेमाची बरसात केलीस ☔️
माझी काया तू भिजवलीस, चिंब केलीस
माझ्या देहाचा सारा भार गळून पडला,
मिठी मारून तू तो हलका केलास.

     माझ्या गळ्यात तुझे हस्त बांध, प्रिया 🙌
     प्रेमाने मला तू जवळ घे, प्रिया 👩‍❤️‍‍👨
     आज माझे प्रेम तुझे झालेय,
     माझ्यावर आता तुझाच अधिकार आहे, प्रिया.

     रोज माझे डोळे तुझ्याकरताच उठतील
     या माझ्या नयनांत रोज तूच असशील 👀
     या माझ्या डोळ्यांनी मी तुला मनात सामावेन,
     या डोळ्यांत रोज तुझीच छबी असेल. 👀 🖼

     प्रथम तुला पाहताच मी तुझ्या प्रेमात पडले
     प्रथमच तुला पाहता मी तुला मन दिले
     आताही मी तुझीच आहे, आयुष्यभर असेन,
     आताही प्रेम करतेय तुझ्यावर, सदा सर्वकाळ करेन.

बस मला एवढंच हवं होतं, लाडके
तुझ्या डोळ्यांतून मला ते दिसतं होतं, प्रिये
हे प्रेम असंच पाझरू दे, मला त्यात बुडू दे,
तुझ्या नयन प्रेम-सागरात मला अखंड डुंबू दे.

तुझ्या नजरेत आहेच अशी जादू
त्यांनीच मला तुझ्या प्रेमात पाडलंय
आता या डोळ्यांचा मी आहे गुलाम,
त्यात हरवूनच गेलोय मी, झालोय मी गुमनाम.

मदमस्त डोळे पाहून मी मदहोश झालोय, 👀
तुझ्या एक नजरेने मी बेहोष झालोय !
तुझ्या डोळ्यांत मी प्रेमाचा पाझर पाहीला,   
वाहणारा, मायेचा असा निर्झर पाहीला.

मदमस्त डोळे पाहून मी मदहोश झालोय, 👀
तुझ्या एक नजरेने मी बेहोष झालोय !
माझी अवस्था आज मद्यधुंद होतेय,
कधी नव्हे तो आज मी बेकाबू झालोय !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.03.2023-सोमवार.
=========================================