हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून-स्वर्ग

Started by Atul Kaviraje, March 20, 2023, 11:27:16 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून"
                           --------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून" या शीर्षकI-अंतर्गत हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायिका "आलेग्रा, स्नोह", यांचे एक भाषांतरित,अनुवादित गाणे. या गाण्याचे शीर्षक आहे- "Paradise"-"स्वर्ग"

                                         "स्वर्ग"
                                        -------
"Paradise"
"स्वर्ग"
------------

त्या रात्रीच्या ट्रेनमध्ये मी गाढ झोपी गेलो
लहान मोठ्या स्वप्नांत मग हरवून गेलो
लौरीन माझ्या कानात काही कुजबुजत होता
काहीतरी निरर्थक बडबडत होता
ज्याला मी टाळू शकत नव्हतो
ज्याकडे मी दुर्लक्ष करू शकत नव्हतो 
याआधी नायक माझा वापर करीत होते
जेव्हा एम टी व्ही, संगीत वाजवत होते
मी त्या आवाजाच्या प्रेमात पडलो
आणि मी तो आवाज मोठा करू लागलो
चुरगळलेल्या कागदाच्या ढिगावर माझी श्रद्धा होती
माझा रस्ता मी स्वतःच  शोधणार होतो
मी स्वतःच याची वचनपूर्ती केली होती.

मी मागे वळून पाहणार नव्हतो
त्याच रस्त्याने मी पुढे जाणार होतो
डॅश बोर्डावर कुठलाही नकाशा नव्हता
कारण मला आधीच माहित होत, आधीच होत
मी गॅसवर पाय खाली ठेवला
कारण आम्ही उद्याचं वचन दिलंच नव्हतं
इम्माने माझ्या डोळ्यातली आग पाहीली होती
आणि ती माझा रस्ता प्रकाशमान करीत होती. 

मी स्वर्गापासून फक्त एकचं मैल दूर आहे
(स्वर्ग, स्वर्ग, स्वर्ग)
मी स्वर्गापासून फक्त एकचं मैल दूर आहे
(स्वर्ग, स्वर्ग, स्वर्ग).

मला विमानात जाग आली
उडत असताना विचार मनी आला
माझ घर कुठे आहे ?
मी निनावीच प्रवास करत होतो
कारण कधी कधी प्रवास हा एकट्यानेच करायचा असतो
माझ्या आजूबाजूची लोकं वेळ वाया घालवीत होती
ट्रIयीना मला तो कसा घालवायचा हे सांगत होती
खेद नाही, खंत नाही
मला काय हवंय ते मला आधीच माहित होतं
चुरगळलेल्या कागदाच्या ढिगावर माझी श्रद्धा होती
माझा रस्ता मी स्वतःच शोधणार होतो
मी स्वतःच याची वचनपूर्ती केली होती.

मी मागे वळून पाहणार नव्हतो
त्याच रस्त्याने मी पुढे जाणार होतो
डॅश बोर्डावर कुठलाही नकाशा नव्हता
कारण मला आधीच माहित होत, आधीच होत
मी गॅसवर पाय खाली ठेवला
कारण आम्ही उद्याचं वचन दिलंच नव्हतं
इम्माने माझ्या डोळ्यातली आग पाहीली होती
आणि ती माझा रस्ता प्रकाशमान करीत होती. 

मी स्वर्गापासून फक्त एकचं मैल दूर आहे
(स्वर्ग, स्वर्ग, स्वर्ग)
मी स्वर्गापासून फक्त एकचं मैल दूर आहे
(स्वर्ग, स्वर्ग, स्वर्ग).

त्याचवेळी मला जाणवलं होतं, वाटलं होतं
मी खोल खोल पोहून जात आहे
मी माझ्या आईला नवीन घराचं वचन दिलं होतं
ती सर्वार्थाने माझ्यावरच अवलंबून होती
खोट्या मित्रांची व्याख्या मला समजली होती
मला ती फार मुश्किलीने कळली होती
पण तसं ती लोकं मुद्दामूनच भासवत होती
मी गाडी चालविताना उजवी आणि डावीकडे पाहीले
इकडून तिकडे जाताना ते ओळखीचेच वाटले
त्यांनी तेच प्रवासाचे तिकीट घेतले होते
आणि एकाचं वेळी ते त्याच रस्त्याने प्रवास करीत होते
पण मी ठीकच असेन, चांगलIच असेन.

मी मागे वळून पाहणार नव्हतो
त्याच रस्त्याने मी पुढे जाणार होतो
डॅश बोर्डावर कुठलाही नकाशा नव्हता
कारण मला आधीच माहित होत, आधीच होत
मी गॅसवर पाय खाली ठेवला
कारण आम्ही उद्याचं वचन दिलंच नव्हतं
इम्माने माझ्या डोळ्यातली आग पाहीली होती
आणि ती माझा रस्ता प्रकाशमान करीत होती. 

मी स्वर्गापासून फक्त एकचं मैल दूर आहे
(स्वर्ग, स्वर्ग, स्वर्ग)
मी स्वर्गापासून फक्त एकचं मैल दूर आहे
(स्वर्ग, स्वर्ग, स्वर्ग).

फक्त तुम्हाला माहीत आहे म्हणून
(स्वर्ग, स्वर्ग, स्वर्ग)
फक्त तुम्हाला माहीत आहे म्हणून
(स्वर्ग, स्वर्ग, स्वर्ग).

--आलेग्रा, स्नोह
--------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-az-लैरिकस.कॉम)
                   ------------------------------------------

-----संकलक आणि अनुवादक 
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.03.2023-सोमवार.
=========================================