दिन-विशेष-लेख-जागतिक अरण्य दिन

Started by Atul Kaviraje, March 21, 2023, 09:56:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                                 "जागतिक अरण्य दिन"
                                ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२१.०३.२०२३-मंगळवार आहे, मार्च २१ हा दिवस "जागतिक अरण्य दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

                 जागतिक वन दिवस--

     आज २१ मार्च जागतिक वन दिन हा संपूर्ण जगात साजरा केला जातो, वाढती लोकसंख्या, अतिक्रमण व विज्ञान व तंत्रज्ञानामुळे व वाढत्या औद्योगिक कारणामुळे व वाढत्या बांध कामामुळे बेसुमार प्रदूषण वाढत आहे, बेसुमार वृक्ष तोड होत आहे, हव्या त्या प्रमाणात वृक्ष संवर्धन होत नाहीए जंगल, वन क्षेत्र कमी होत आहे वनसंपदा व जैव संपदा नष्ट होत आहे , हे सर्व प्रगती व विकासाच्या नावाखाली हा जीवघेणा खेळ सुरु आहे.

     आपल्या संतांनी वन व वृक्ष यांचे महत्व ओळखले होते, म्हणून ते म्हणतात " वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे ", पृथ्वी व मानव जात जर टिकवायची असेल तर आपल्याला वृक्ष व जंगल , वन संपदा यांचे संवर्धन केले पाहिजे व अशा प्रकारचा शाश्वत विकास केला पाहिजे, वनसंवर्धन केलेच पाहिजे.

              (साभार आणि सौजन्य-संदर्भ-फेसबुक.कॉम/नाशिक प्रतिबिंब)
             -----------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.03.2023-मंगळवार.
=========================================