डोक्याला तेल लावा, तेल मालिश करा, डोकं थंड ठेवायचा एकचं उपाय खरा !

Started by Atul Kaviraje, March 21, 2023, 11:32:43 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, डोक्याच्या तेल मालिशची विनोदी कविता-गीत ऐकवितो. "सर जो तेरा चकराये, या दिल डूबा जाये,आजा प्यारे पास हमारे, काहे घबराय, काहे घबराय"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. मार्च महिन्याची ही मंगळवार-रात्र आपणास आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे- (सर जो तेरा चकराये, या दिल डूबा जाये,आजा प्यारे पास हमारे, काहे घबराय, काहे घबराय)
-----------------------------------------------------------------------

    "डोक्याला तेल लावा, तेल मालिश करा, डोकं थंड ठेवायचा एकचं उपाय खरा !"
   ---------------------------------------------------------------------

डोक्याला तेल लावा, तेल मालिश करा,
डोकं थंड ठेवायचा एकचं उपाय खरा !
डोकेदुखीला एकचं जालीम उपाय, मित्रांनो,
तेल डोक्यावर चोळा, उपाय आणे सोळा.

डोक्याला तेल लावा, तेल मालिश करा,
डोकं थंड ठेवायचा एकचं उपाय खरा !
मुळात आधी भांडूच नका, वाद कधी घालू नका,
तुमच्या डोकेदुखीला पहा, तेलच देईल उतारा.

चक्कर जेव्हा येईल तुम्हाला
जीव घाबरा होईल जेव्हा तुमचा
हमखास तुम्ही या माझ्याकडे,
गुणकारी उपाय आहे पहा, माझ्याकडे.

तुम्ही सर्वांनी या, कुटुंबाला घेऊन या
घाबरू नका, अगदी बिनधास्त या
माझे हे तेलच तुम्हाला तारेल,
माझे हे तेलच तुम्हाला बरे करेल.

माझ्या तेलात आहे जादू, बघा
माझ्या तेलाचे सामर्थ्यच आहे वेगळे
हसत हसत मी करतो मालिश,
तुमच्या केसांना येईल रूप आगळे.

खरबI कधी होणार नाही
कोरडेपणा कधी राहणार नाही
माझा एकदा हात फिरल्यावर,
तुमचं नशीब तसंच राहणार नाही.

सर्वांनीच ऐका, माझं म्हणणं ऐका
या चंपीसह मी डोक्यावरही धरतो ठेका
गुणकारी अशी ही माझी तेल चंपी,
कमी करते केस गळण्याचाही धोका.

लाख दुःखावरचे हे एकचं औषध
माझ्या तेल मालिशने होतात सगळेच सावध
आजच आजमावून बघा, मित्रांनो,
माझ्याकडून तेल मालिश करून घ्या, मित्रांनो.

प्रेमात झाली जर तुमची लढाई
धंद्यात झाली जर तुमची बढाई
या तुमच्या डोकेदुखीला मी सांभाळतो,
माझ्याकडे या, मी तुमचे मालिश करतो.

सर्व सर्व लफडी मी मिटवतो, मित्रांनो
साऱ्या प्रश्नांतून मी सुटका देतो, मित्रांनो
माझ्या तगडा हात डोक्यावर जेव्हा फिरेल,
सर्व लफड्यांतून तुम्हाला सहज मुक्तता मिळेल.

दुःख मग नावालाही उरणार नाही
डोकेदुखी तुमची डोके वर काढणार नाही
माझ्याकडे या, डोक्याची चंपी करून घ्या,
माझ्या मालिशने डोकेदुखीला पळवून लावा.

नोकर असू दे, वा मालक असू दे
नेता असू दे, वा जनता असू दे
माझ्याकडे सर्वांसाठी इलाज आहे,
माझ्या तेल चम्पीचा वेगळाच अंदाज आहे.

माझ्यापुढे कुणीही लहान मोठे नाही
माझ्यापुढे काहीही खरे खोटे नाही
सर्वांच्या मनातलं मी नेमकं ओळखतो,
चंपी करता करता त्यांच्या मनातलं सांगतो.

राजा असू दे, वा त्याचा सैनिक असू दे
सम्राट असू दे, वा त्याचा मंIडलिक असू दे
माझ्यापुढे सारेच होतात नतमस्तक,
मी सर्वांचेच चंपी करून देतो मस्तक.

अशी ही गुणकारी चंपी तुम्हीही आजमावा
तुम्ही सर्वांनीच डोक्यावर हे तेल लावा
माझा मालिशचा धंदा वाढण्यास मदत करा,
तुमचे डोके थंड ठेवण्यास त्वरा करा.

डोक्याला तेल लावा, तेल मालिश करा,
डोकं थंड ठेवायचा एकचं उपाय खरा !
डोकेदुखीला एकचं जालीम उपाय, मित्रांनो,
तेल डोक्यावर चोळा, उपाय आणे सोळा.

डोक्याला तेल लावा, तेल मालिश करा,
डोकं थंड ठेवायचा एकचं उपाय खरा !
मुळात आधी भांडूच नका, वाद कधी घालू नका,
तुमच्या डोकेदुखीला पहा, तेलच देईल उतारा.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.03.2023-मंगळवार.
=========================================