दिन-विशेष-लेख-जागतिक जल दिन

Started by Atul Kaviraje, March 22, 2023, 10:18:38 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "दिन-विशेष-लेख"
                                   "जागतिक जल दिन"
                                  -------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२२.०३.२०२३-बुधवार आहे, मार्च २२ हा दिवस "जागतिक जल दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

                 जागतिक जल दिन का साजरा केला जातो ?--

     पाणी हे सर्वांसाठी अत्यंत गरजेचे आहे. त्याच्याशिवाय सजीव प्राणी, झाडे यांचा विनाश होईल. त्यामुळेच 'जल है तो जीवन हे' असे मानले जाते. आपल्या जीवनात म्हणूनच पाण्याचे महत्व मोठे आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे, सर्व नैसर्गिक स्त्रोतांचा अतिवापर आणि शोषणामुळे मानवाला पाण्याच्या तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. हे संकट भविष्यात आणखी वाढू शकते. पाणी हा सर्व सजीवांच्या अस्तित्वाचा एक महत्त्वाचा घटक असल्याने, पाण्याचे महत्त्व आणि त्यानुसार त्याची उपयुक्ततता याविषयी जागरूक करण्यासाठी दरवर्षी २२ मार्च हा जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो.

     हा आहे इतिहास- जगाला पाण्याच्या गरजेविषयी जागरूक करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक जल दिन साजरा करण्यास सुरूवात केली. १९९२ मध्ये ब्राझीलच्या रिओ दि जानेरो येथे आयोजित केलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण आणि विकास परिषदेत (UNCED) जागतिक जल दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर १९९३ पासून पाण्याच्या संरक्षणाचे महत्व समजून घेण्यासाठी सामुदायिक जागरूकता वाढविण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जाऊ लागला. पहिल्या जागतिक जल दिवसाचे आयोजन २२ मार्च १९९३ साली करण्यात आले होते.

--सकाळ डिजिटल टीम
---------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इ-सकाळ.कॉम)
                    ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.03.2023-बुधवार.
=========================================