II गुढी पाडवा II-... नवं मराठी वरिस...-कविता-6

Started by Atul Kaviraje, March 22, 2023, 10:32:06 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      II गुढी पाडवा II
                                     ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२२.०३.२०२३-बुधवार आहे. आज "गुढी-पाडवा आहे". शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. ऐकूया या पवित्र सणाच्या काही कविता.

                               "... नवं मराठी वरिस..."
                              -----------------------

नवं मराठी वरिस

नव कार्याचा आरंभ

गुढी उभारू हर्षाने

करू उल्हासे प्रारंभ....


वाचनाची करू गुढी

शिक्षणाचा वसा घेऊ

नव वर्षाच्या मुहुर्ती

हाती वही पेन देऊ...


करू संकल्प आपण

अभियान स्वच्छतेचे

धडे चालू करू आता

पुत्र पुत्री समतेचे...


चैत्र मास चैतन्याचा

नव पालवी येण्याचा

गर्भातच नका खुडू

जीव सानुल्या लेकीचा...


गुढी उभारू ही आता

देश बनवू साक्षर

नको कोणी निरक्षर

चला गिरवू अक्षर...

--गीता केदारे
------------

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
                        -----------------------------------------

------संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.03.2023-बुधवार.
=========================================