II गुढी पाडवा II-शुभेच्छा-1

Started by Atul Kaviraje, March 22, 2023, 10:34:14 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                    II गुढी पाडवा II
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२२.०३.२०२३-बुधवार आहे. आज "गुढी-पाडवा आहे". शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुढीपाडव्याच्या काही हार्दिक शुभेच्छा.

                        गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा--

     गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. महाराष्ट्रासोबतच गुढीपाडवा दाक्षिणात्य राज्यात आणि गोव्यातही उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळे या दिवशी उत्साहात असतात. लहान मुलं आणि खास करून नवीन जोडपे ज्यांना गुढीपाडव्या बद्दल माहीतच नसते किंवा कुतूहल असते जाणून घेण्याचे कि गुढी कशी उभारली जाते हे बघण्याची. या नववर्षाच्या निमित्ताने आवर्जून एकमेंकाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा मराठी (Gudi Padwa Wishes In Marathi) दिल्या जातात. या लेखात आपण गुढीपाडव्याच्या निमित्ताने दिले जाणाऱ्या शुभेच्छा म्हणजेच गुढीपाडवा एसएमएस (Gudi Padwa sms In Marathi), गुढीपाडवा कोट्स (Gudi Padwa Quotes In Marathi) आणि गुढीपाडवा स्टेटस (Gudi Padwa Status In Marathi) पाहणार आहोत.

=========================================
--आपल्या परिवाराला हक्काने शुभेच्छा द्या या शुभ सणाच्या निमित्ताने आणि साजरा करा नववर्षाचा जल्लोष.

--नवीन पल्लवी वृषलतांची, नवीन आशा नववर्षाची, चंद्रकोरही नवीन दिसते, नवीन घडी ही आनंदाची, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.

--नव्या संकल्पांनी करूया नववर्षाचा शुभारंभ, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
नववर्षाभिनंदन आईबाबा आणि आजी-आजोबा. 

--नूतन वर्ष आणि गुडी पाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!

--नवंवर्ष नवा हर्ष....नवा जोश नवा उत्कर्ष.....नववर्षाभिनंदन.

--नव्या वर्षात आपल्या सर्वांच्या स्वप्नांना मिळो नवी भरारी, आयुष्याला लाभो तेजोमयी किनार, हीच सदिच्छा...नववर्षाच्या निमित्ताने आज !

--नववर्षाची सुरूवात होवो न्यारी..सुखसमृद्धीने सजो आपली गुढी..हीच शुभेच्छा आहे आज माझ्या मनी

--आयुष्याची गोडी वाढवणारा चैत्र आला चला करू पुन्हा नव्याने सुरूवात एका चैतन्याच्या अध्यायाला..गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.

--पडता दारी पाऊल गुढीचे, आनंदी आणि मांगल्यमय होई जग सारे, या सणाला करू आनंदाचा जल्लोष कारण आले आहे हिंदू नववर्ष

--पाडव्याची नवी पहाट, घेऊन येवा तुमच्या आयुष्यात सुखाची लाट, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
=========================================

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.पॉप xo.कॉम)
                     --------------------------------------------

------संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.03.2023-बुधवार.
=========================================