II गुढी पाडवा II-शुभेच्छा-6

Started by Atul Kaviraje, March 22, 2023, 10:44:09 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     II गुढी पाडवा II
                                    ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२२.०३.२०२३-बुधवार आहे. आज "गुढी-पाडवा आहे". शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुढीपाडव्याच्या काही हार्दिक शुभेच्छा.

                       गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
--गो कोरोना म्हणता म्हणता पूर्ण वर्ष गेले
मग काय झाले पुन्हा हिय्या करू आणि पुन्हा कोरोनाला गो कोरोना गो करू
गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुन्हा सज्ज होऊ

--गुढीपाडव्याचं मंगलपर्व आहे म्हटल्यावर एकमेकांना शुभेच्छा देताना तुम्ही हे गुडी पाडवा कोट्सही वापरू शकता.

--उभारून गुढी, लावू विजयपताका...नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

--वर्षामागून वर्ष जाती, नवे क्षण नवी नाती घेऊनि येते नवी पहाट तुमच्यासाठी...नववर्षाभिनंदन.

--मंगलमय गुढी..लेऊनी भरजरी खण..आनंदाने साजरा करा पाडव्याचा सण

--नव्या वर्षात होऊ दे मनाला नव्या विचारांचा स्पर्श, नवे वर्ष मग आणेल आयुष्यात नवा हर्ष..नववर्षाभिनंदन.

--घरात आला आहे शुभ संदेश, गुढीचा करून वेष आले आहे नववर्ष, नववर्षाभिनंदन.

--नव्या वर्षाची करा दमदार सुरूवात आणि लिहा नवंI इतिहास.

--एक ताजेपणा, एक नाविन्य नवीन वर्षात करू काही नाविन्यपूर्ण...नववर्षाच्या शुभेच्छा.
चला पुन्हा घेऊन नवी उमेद साजरं करू हे नवं वर्ष.

--आयुष्याला मिळेल नवी कलाटणी, चला गुढी उभारू आनंदाची. नवंवर्षाभिनंदन.

--सुख-दुखाप्रमाणेच गुढीतही आहे कडू-गोड चवीचा मेळ..तसाच आहे जीवनाचा हा खेळ...पुन्हा घेऊ नव्या ध्यास आणि सुरूवात करू या नवीन वर्षाला खास.
=========================================

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.पॉप xo.कॉम)
                    ---------------------------------------------

------संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.03.2023-बुधवार.
=========================================