II गुढी पाडवा II-शुभेच्छा-7

Started by Atul Kaviraje, March 22, 2023, 10:45:33 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II गुढी पाडवा II
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२२.०३.२०२३-बुधवार आहे. आज "गुढी-पाडवा आहे". शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुढीपाडव्याच्या काही हार्दिक शुभेच्छा.

                      गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
--देवाच्या कृपेन सर्व संकट होऊ दे दूर
मनातील चिंता आणि हूरहून होऊ दे दूर
नववर्ष आलं आता तरी जा रे बाबा कोरोना दूर
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

--गुढी उभारली, फुलं वाहिली, नमस्कार केला वाकून
देव म्हणाला जाईल कोरोनाच संकट तुम्ही फिरा तोंड झाकून

--मास्कची नवलाई अजूनही कायम आहे
कोरोनाची चिंता अजूनही कायम आहे
तरीही नववर्षाची आतुरताही कायम आहे
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

--गुढी उभारून देवाला करा गाऱ्हाणं
पुढच्या वर्षी नको देवा कोरोनाचं असणं
आरोग्यदायी नववर्षाच्या शुभेच्छा

--सॅनिटायजर ठेवा सोबत मास्क लावा तोंडावर
नाहीतर नवीन वर्षात भेटीला येईल कोरोना आणि आनंद जाईल लांबवर

--या वर्षी मी तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणार नाही तर तिघांना तुमच्याकडे पाठवणार आहे. ते म्हणजे सुख, शांती आणि समृद्धी...!!! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

--एकनिष्ठ...कट्टर...मग येतात, नववर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्याला देणारे
आपलं नवीन वर्ष एकच गुढीपाडवा...नो हॅपी न्यू ईयर फक्त हॅपी गुडीपाडवा.

--नवचैतन्य आणते नववर्ष, श्रीखंड-पुरीचा आस्वाद घेत करा नवा संकल्प, चला करूया नववर्षाचा आरंभ.

--आनंदाची शिदोरी घेऊन आला गुढीपाडवा नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

--आई भवानीच्या कृपेने नववर्षात मनासारखे घडू दे...!! सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...!!
=========================================

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.पॉप xo.कॉम)
                    ---------------------------------------------

------संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.03.2023-बुधवार.
=========================================