II गुढी पाडवा II-शुभेच्छा-8

Started by Atul Kaviraje, March 22, 2023, 10:46:46 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     II गुढी पाडवा II
                                    ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२२.०३.२०२३-बुधवार आहे. आज "गुढी-पाडवा आहे". शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुढीपाडव्याच्या काही हार्दिक शुभेच्छा.

                     गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
--तुमच्या इच्छाआकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे...नववर्षात उभारा गुढी यशाची...नववर्षाभिनंदन.

--आयुष्याच्या वीणेवर छेडा सुखाचा सूर, नववर्ष घेऊन आले चैतन्याचा सण...गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.

--आयुष्य व्हावे स्वप्नासारखे साकार, हाच विचार मनात घेऊन करूया नव्या वर्षाला सुरूवात. नववर्षाभिनंदन.

--गुढीपाडव्याच्या अनेक आख्यायिका आहेत..पण मला एकच माहीत आहे ती म्हणजे श्रीखंड-पुरी खाण्याची. नववर्षाभिनंदन.

--जुन्या आठवणींचं गाठोडं बांधून
पाहूया नववर्षाची वाट
जे आणेल आनंदाची बहार
अशी गुढीपाडव्याची परंपरागत सुरूवात
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

--नव दुर्गांच्या आगमनाने सजते नववर्ष
गुढी उभारल्याने बहरते हे नववर्ष
कोकिळा म्हणते नववर्षाचा मल्हार
निसर्गाच्या संगीताला येतो आकार
चैत्राच्या सुरूवातीने होतो नवआरंभ
हाच आहे हिंदू नववर्षाचा प्रारंभ
हॅपी गुडी पाडवा

--आयुष्य एक वीणा आणि सूर भावनांचे
गाऊया धुंद मग्न होऊन संगीत हिंदू नववर्षाचे
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

--गुढीपाडव्याच्या अनेक कथा
गुढी आहे विजयाची पताका
वृक्ष सजतो चैत्र महिना
म्हणून हे आहे हिंदू नववर्ष
हॅपी गुढीपाडवा

--कोरोनाला टाळू घरोघरी गुढी उभारू
नवचैतन्याने पुन्हा एकदा आयुष्य उभारू.
=========================================

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.पॉप xo.कॉम)
                    ---------------------------------------------

------संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.03.2023-बुधवार.
=========================================