प्रेमातल्या ओळखीवर कविता-गीत-तुला माझी ओळख पटली, तुझी पारख मला झाली !

Started by Atul Kaviraje, March 22, 2023, 04:59:48 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, प्रेमातल्या ओळखीवर कविता-गीत ऐकवितो. "हो, तुम से अच्छा कौन है, दिल लो जिगर लो जान लो, हम तुम्हारे हैं सनम, तुम हमे पहचान लो "- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. मार्च महिन्याची ही बुधवार-दुपार आपणास आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे- (हो, तुम से अच्छा कौन है, दिल लो जिगर लो जान लो, हम तुम्हारे हैं सनम, तुम हमे पहचान लो)
-------------------------------------------------------------------------

                    "तुला माझी ओळख पटली, तुझी पारख मला झाली !"
                   -----------------------------------------------

तुला माझी ओळख पटली,
तुझी पारख मला झाली !
चांगल्याच मनाची आहेस तू,
माझ्या दिलाची तू राणी झालीस ! 💖  👰🏽‍

तुला माझी ओळख पटली,
तुझी पारख मला झाली !
लाखातून तुला मी निवडलंय, प्रिये,
माझी निवड तुला कशी वाटली ?

तुझ्या नावाप्रमाणेच तू आहेस
तू मनाने खूप चांगली आहेस
मीही तुझाच प्रियकर आहे, सखे
माझा तू स्वीकार कर, लाडके.

मी मस्त हवेचा एक झोका आहे 💨
मी या वाऱ्याचा एक तरंग आहे 💨
हेलकावत आहे, लहरत आहे,
बिनधास्त इथून तिथे फिरत आहे.

जेव्हापासून तू मला भेटलीस 🚻
जेव्हापासून मी तुझ्या प्रेमात पडलो 💑
माझ्या चालण्याला खीळ पडलीय,
माझ्या वेगाला मर्यादा आलीय.

आणि आता मी तुझ्यात गुंतलोय
तुझ्या प्रेमात मी हरवून गेलोय
तुझाच मार्ग मी स्वीकारलाय, 🏞
तुझा सहवास मला आवडलाय.

इतकं छान प्रेम मला गवसलंय
याला कारणीभूत तूच आहेस
माझं जीवनच मला मिळालंय,
माझं आयुष्य तूच आहेस.

माझ्या छातीत हृदय धडकतंय 💝
धडकताना तुझंच नाव घेतंय
केव्हाच आलीस माझ्या जीवनात,
कळलंच नाही केव्हा शिरलीस दिलात.

तुला पाहिल्यापासून हे दिल तुझंच झालंय 💕
आता माझं हृदय हे तुझंच झालंय 💘
माझ्या मनात तुझीच छबी आहे, 🖼
प्रिये, ही दिलकी लगीच आहे.

तुला माझी उमर लागो, प्रिये
तुला कुणाची नजर न लागो, प्रिये
माझं मन तुला सांभाळू पाहतंय,
हलकेच तुला पिसागत गोंजारु पाहतंय.

तू सुरक्षित आहेस, यातच सर्व आलं
तुला ठीक पाहून, माझं मन निमालं
तुझ्यामुळेच तर मी आहे, प्रिये,
माझ्या तारुण्याचं रहस्य तूच आहेस, प्रिये.

तुझा चांगुलपणा मला प्रथमच कळला
तुझा भलेपणा मला प्रथमच दिसला
कोण नाही तुझ्या प्रेमात पडणार ? 👍
कोण नाही तुला मन देणार ? 💖

केव्हातरी मला मरावस वाटलं
केव्हातरी जगू नये असं वाटलं
पण तुझ्या प्रेमाने माझं मत-परिवर्तन केलं,
पण तुझ्या प्रेमाने मला जीवन दिलं.

तुझ्या प्रेमाने मला वाचवलंय, प्रिये
तुझ्या प्रेमाने मला संरक्षिलं, प्रिये
जेव्हापासून तुझ्याशी लगाव झाला,
तेव्हापासून हा जीव तुझा झाला.

बहुतेक ही तुझ्या नजरेची किमया असावी 👀
तुझ्या नजरेने जादूच केली असावी
जणू मरता मरता आज मी वाचलोय,
तुझ्या प्रेमानेच आज मी बचावलोय.

बस तू अशीच रहा, प्रिये
फक्त तू प्रेम वाटतं रहा, प्रिये
तुझ्याशिवाय मला कुणीच नाही,
तुझ्याशिवाय कुणी चांगलं असूच शकत नाही.

तुला माझी ओळख पटली,
तुझी पारख मला झाली !
चांगल्याच मनाची आहेस तू,
माझ्या दिलाची तू राणी झालीस ! 💖  👰🏽‍

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.03.2023-बुधवार.
=========================================