२२-मार्च-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, March 22, 2023, 10:09:55 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२२.०३.२०२३-बुधवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                   "२२-मार्च-दिनविशेष"
                                  --------------------

-: दिनविशेष :-
२२ मार्च
जागतिक जल दिन
World Water Day
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९७०
हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.
१९४५
अरब लीगची स्थापना
१९३३
डकाऊ छळछावणीची (Concentration Camp) सुरूवात झाली.
१७३९
नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९२४
मधुसूदन कालेलकर – नाटककार, कथाकार आणि पटकथाकार
(मृत्यू: १७ डिसेंबर १९८५)
१७९७
विल्हेल्म (पहिला) – जर्मन सम्राट
(मृत्यू: ९ मार्च १८८८)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००४
बॅरिस्टर व्ही. एम. तथा 'भाऊसाहेब' तारकुंडे – कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्‍च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ
(जन्म: ३ जुलै १९०९)
१९८४
प्रभाकर आत्माराम पाध्ये – लेखक व पत्रकार
(जन्म: ? ? १९०९)
१८३२
योहान वूल्फगाँग गटें – जर्मन महाकवी, लेखक, कलाकार आणि राजकारणी. गटें यांनी कालिदासाच्या 'शाकुंतल'चे जर्मनमधे भाषांतर केले आहे.
(जन्म: २८ ऑगस्ट १७४९)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.03.2023-बुधवार.
=========================================