मस्तवाल मनुष्याची कविता-गीत-मी मनमौजी, मी मनाचा बादशा, मी करेन तीच पूर्व दिशा !

Started by Atul Kaviraje, March 23, 2023, 05:36:53 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, मस्तवाल मनुष्याची कविता-गीत ऐकवितो. "मस्त बहारों का मैं आशिक़, मैं जो चाहे यार करूँ"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. मार्च महिन्याची ही गुरुवार-सायंकाळ आपणास आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे- (मस्त बहारों का मैं आशिक़, मैं जो चाहे यार करूँ)
------------------------------------------------------------

               "मी मनमौजी, मी मनाचा बादशा, मी करेन तीच पूर्व दिशा !"
              -----------------------------------------------------

मी मनमौजी, मी मनाचा बादशा,
मी करेन तीच पूर्व दिशा ! 🌄
माझ्या आयुष्यात बहIरच बहIर आहेत,
मग नावालाही कशी उरेल निराशा ! 😒

मी मनमौजी, मी मनाचा बादशा,
मी करेन तीच पूर्व दिशा ! 🌄
माझे मन मानेल तसंच मी वागतो,
पूर्ण करतो मी माझ्या साऱ्या अभिलाषा.

मी सर्वांचाच आशिक आहे
मी सर्वांचाच चाहता आहे
हे सारे जग माझेच आहे, 🌍
ही अखिल दुनिया माझीच आहे. 🌎

कधी मी बागेतल्या फुलांशी मैत्री करतो  🥀 🍀
कधी मी सुंदर कळ्यांशी सलगी करतो 🌹
मला कोणताही ऋतू कधीही आवडतो,
मी तर सर्वांनाच पहा कसा भावतो.

मी तर एक दिवानाच आहे
या दिवान्याचे तर सारेच दिवाने आहेत
मी नेईन तिथे सारे येतात,
माझ्या येण्याची सारे वाट पहात राहतात.

अरे जमान्या, तुझ्यासाठी मी थांबणार नाही
तुझ्यासमोर मी कधीही झुकणार नाही 🙇
पहा माझा रस्ता स्वतः मी शोधतो, 🏞
या राजमार्गावरचा मी राजाच असतो. 🏘 🤴

माझं या दुनियेशी काही काम नाही
माझा या दुनियेशी काहीही संबंध नाही
मी मुक्त आहे, मी गुलाम नाही,
मी स्वतंत्र आहे, मला कोणाचाही धाक नाही.

माझं मन अजुनी तरुण आहे
त्यात इच्छा अजुनी कुटून कुटून भरल्यात
त्या पूर्ण करण्याची ताकद माझ्यात आहे,
संकल्प तडीस नेण्याची कुवत माझ्यात आहे.

माझ्या नजरेला कुणीही नजर नाही मिळवत 👀
माझी तशीच तर आहे इथे दहशत 👊 💪
माझ्या नजरेच्या धाकाला घाबरून, 👀
काळही राहील कापत आणि थरथरत. 🙏

तुम्ही कितीही प्रयत्न करा मला थांबवण्याचा 🖐
तुम्ही कितीहि आर्जव कर मला रोखण्याचा 🖐
मी माझ्याच मर्जीचा मालिक आहे, 💪
मला वाटेल तेच मी करणार आहे.  👍

तुम्हाला शपथ घेऊन सांगतो मी
तुम्हाला हे निक्षून सांगतो मी
मी एकदा का गेलो की येणार नाही परत,
मग कितीही वेळ जाऊदे सरत.

मी गेल्यावर मग ही बहार निघून जाईल
मी गेल्यावर मग हा ऋतूही पाठ फिरविल
ही बहार फक्त माझ्यासाठी थांबली आहे,
हा ऋतू फक्त मलाच साथ करतो आहे.

सगळ्यांना तुम्ही आताच सांगून ठेवा
सर्वांना तुम्ही आताच कळवून ठेवा
हा इलाका माझा आहे, ही गल्ली माझी आहे,
हा रस्ता माझा आहे, इथले स्थान माझे आहे. 🏞

इथून जाण्यास साऱ्यांना मनाई आहे
इथे येण्यास साऱ्यांना मज्जाव आहे
इथून आलात गेलात, तर तुम्ही भोगIल,
माझ्या रागाला, क्रोधाला तुम्ही बळी पडाल. 👊

या दुनियेला सांगून ठेवा तुम्ही
या जगाला पढवून ठेवा तुम्ही
मी म्हणतोय तसंच होत राहील,
मी सांगतोय तसंच घडत राहील.

या पतझडीला सांगा, इथे फिरकूही नकोस
या पानगळीला सांगा, तुझं तोंडही दाखवू नकोस
हा आलेला बहर माझ्यासाठी आहे,
हा फुललेला ऋतू माझ्यासाठीच आहे.

ही बाग माझी आहे, ही झाडे माझी आहेत 🌳
या कळ्या माझ्या आहेत, ही फुले माझी आहेत 🌹 🥀
हा सुंदर निसर्ग माझ्यासाठीच आहे,
सर्व सर्व सुंदर वस्तूचा मी भोक्ता आहे.

मी मनमौजी, मी मनाचा बादशा,
मी करेन तीच पूर्व दिशा ! 🌄
माझ्या आयुष्यात बहIरच बहार आहेत,
मग नावालाही कशी उरेल निराशा ! 😒

मी मनमौजी, मी मनाचा बादशा,
मी करेन तीच पूर्व दिशा ! 🌄
माझे मन मानेल तसंच मी वागतो,
पूर्ण करतो मी माझ्या साऱ्या अभिलाषा.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.03.2023-गुरुवार.
=========================================