२४-मार्च-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, March 24, 2023, 10:11:43 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२४.०३.२०२३-शुक्रवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                   "२४-मार्च-दिनविशेष"
                                  --------------------

-: दिनविशेष :-
२४ मार्च
जागतिक क्षयरोग निवारण दिन
डॉ. हाईनरिक हर्मन रॉबर्ट कोच यांनी
२४ मार्च
१८८२ रोजी क्षय रोगास कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूंचा (Mycobacterium Tubercule) शोध लावला. त्या काळात सुमारे पाच सहा टक्के लोक क्षय रोगाने दगावत असत. यानंतर सुमारे १०० वर्षांनी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षय रोग निवारण दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. क्षय रोगाची कारणे व त्यावरील उपचार तसेच या रोगाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम यासंबंधी जनजागृती करणारे कार्यक्रम या दिवशी आयोजित केले जातात.
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००८
भूतान हे लोकशाही राष्ट्र बनले व प्रथमच निवडणुका घेण्यात आल्या.
१९९८
'टायटॅनिक' चित्रपटाला विक्रमी ११ ऑस्कर पुरस्कार मिळाले.
१९९३
शूमाकर-लेव्ही-९ या धूमकेतुचा शोध लागला. हा धूमकेतु जुलै महिन्यात गुरु ग्रहावर जाऊन आदळला.
१९७७
स्वातंत्र्यानंतर पहिलेच बिगर काँग्रेसचे सरकार येऊन मोरारजी देसाई पंतप्रधान झाले.
१९२९
लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन
१९२३
ग्रीस हे राष्ट्र प्रजासत्ताक बनले.
१८५५
आग्रा आणि कलकत्ता या शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली.
१६७७
दक्षिण दिग्विजयप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम केला.
१३०७
देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यास मलिक काफूरने कैद करुन दिल्लीला नेले.
[चैत्र व. ४]
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९५१
टॉमी हिल्फायगर – अमेरिकन फॅशन डिझायनर
१९३०
स्टीव्ह मॅकक्‍वीन – हॉलिवूड अभिनेता
(मृत्यू: ७ नोव्हेंबर १९८०)
१७७५
मुथुस्वामी दीक्षीतार – तामिळ कवी व संगीतकार
(मृत्यू: २१ आक्टोबर १८३५)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००७
श्रीपाद नारायण पेंडसे – मराठी कथालेखक व कादंबरीकार
(जन्म: ५ जानेवारी १९१३)
१९०५
ज्यूल्स व्हर्न – फ्रेन्च लेखक
(जन्म: ८ फेब्रुवारी १८२८)
१८८२
एच. डब्ल्यू. लाँगफेलो – अमेरिकन नाटककार व कवी
(जन्म: २७ फेब्रुवारी १८०७)
१८४९
योहान वुल्फगँग डोबेरायनर – मूलद्रव्यांच्या शास्त्रशुद्ध वर्गीकरणाचा प्रथमच प्रयत्न करणारा जर्मन रसायनशास्त्रज्ञ
(जन्म: १३ डिसेंबर १७८०)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.03.2023-शुक्रवार.
=========================================