कविता-हे रेशमी केस, हे मदहोश डोळे, पाहून तुझ्या रुपाला, हरवलेत सगळे !

Started by Atul Kaviraje, March 25, 2023, 03:20:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, प्रियेच्या रूपावर कविता-गीत ऐकवितो. "ये रेशमी ज़ुल्फ़ें, ये शरबती आँखें, इन्हें देख कर जी रहे हैं सभी"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा,व मला प्रोत्साहित करा. मार्च महिन्याची ही शनिवार-दुपार आपणास आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे- (ये रेशमी ज़ुल्फ़ें, ये शरबती आँखें, इन्हें देख कर जी रहे हैं सभी)
-----------------------------------------------------------------------

          "हे रेशमी केस, हे मदहोश डोळे, पाहून तुझ्या रुपाला, हरवलेत सगळे !"
         ---------------------------------------------------------------

हे रेशमी केस, हे मदहोश डोळे, 👀
पाहून तुझ्या रुपाला हरवलेत सगळे !
अगं इतकी देखणी आहेस तू,
पाहून तुझं लावण्य होश खोताहेत सगळे !

हे रेशमी केस, हे मदहोश डोळे, 👀
पाहून तुझ्या रुपाला हरवलेत सगळे !
हा तारुण्याचा खजिना तुला गवसलाय,
या रूपाच्या खाणीला जीव लावताहेत सगळे !

तुझ्या दैवी सौंदर्याला भुललेत सगळे
स्वतःला विसरून तुलाच पाहताहेत सगळे
अगं रूपाची देवीचं जणू या भूतलावरली,
तुझं दर्शन घेण्यास जगताहेत सगळे.

जेव्हा हे डोळे लाजेने खाली झुकतात
जेव्हा हे नयन लज्जेने काही बोलतात
बस, काळ येथेच थांबलाय वाटतं जणू,
ही वेळ पुढेच नाही सरकत वाटतंय जणू.

सारे संवादच येथे संपतात
सारे टक लावून पाहत राहतात
याची खबर लागूच देऊ नका,
हे गुपित गुपितच राहू द्या.

या डोळ्यांनी साऱ्यांचेच होश उडवलेय
या जादुई नेत्रांनी सर्वांना बेहोष केलेय
त्यातील प्रेम-वर्षावात सारे न्हाऊन निघताहेत,
जणू हे अमृत सारे पिऊनच जगताहेत.

या तुझ्या बटा इतस्ततः विखुरल्यात
जणू तुझ्या गुलाबी गालांशी खेळ खेळताहेत
त्या मग्रूर बटIनI तू सांभाळ बळेच,
अगं सगळेच त्यात जणू गुंतून राहताहेत.   

पाहणाऱ्यांची मने या बटा विदीर्ण करताहेत
त्यांच्या हृदयाची त्या शत शत तुकडे करताहेत 💔
सारेच तडपत राहिलेत, सारेच तरसत राहिलेत,
सारेच वेडे झालेत, सारेच खुळे झालेत.

हे कुणी कळूच देऊ नका
हे तिला कुणी सांगूच नका
की या केसांत जीवच गुंतलाय साऱ्यांचा,
ते पाहूनच तर जगताहेत सगळे.

सर्वांनाच तिच्याबद्दल शिकायत आहे
सारेच तिच्याबद्दल कागाळी करताहेत
जणू काही तिच्याकडून आगळीकच घडलीय,
देवाने अशी सौंदर्याची पुतळीच घडवलीय.

तिच्यावरती सारेच तर फिदा आहेत
तिच्या प्रेमात आज सारेच अडकलेत 💕
अशी काही जादू आहे तिच्या रूपात,
तिच्या मोहात आज सारेच फसलेत.

तिच्या सौंदर्याने जणू पागल होऊन
तिच्या नावाने सारे आहे भरताहेत
तिच्या रूपाच्या जाळ्यात फसून,
तिच्याच नावाचा सारे जप करताहेत.

तिने साऱ्यांनाच वेड लावलेय
तिने साऱ्यांनाच पागल केलेय
साऱ्यांच्या असण्याचे कारण तीच आहे,
साऱ्यांच्या जगण्याचे स्रोत तीच आहे.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.03.2023-शनिवार.
=========================================